ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर:यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी वाहिली आदरांजली, विदीप जाधवांच्या कुटुंबियांचीही घेतली भेट

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात ज्या विचारांचे स्थान सर्वोच्च होते, तोच ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या विचारांचा वारसा आता त्यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे चालवताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा सातारा जिल्ह्यातील कराड आणि फलटणला आहे. त्यांनी आज सकाळी १० वाजता कराडच्या प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत, अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.
यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रीतिसंगमावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कराडचे प्रीतीसंगम आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा नेहमीच प्रेरणास्थान राहिली. महत्त्वाच्या राजकीय निर्णयांपूर्वी किंवा संकटाच्या काळात अजितदादांनी नेहमीच या समाधीस्थळी नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवली होती. आपल्या भाषणांमधूनही ते ‘चव्हाणसाहेबांची विचारसरणी’ हाच आपला आधार असल्याचे सांगायचे. आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात प्रीतीसंगमावरून करून, आपण दादांचा हा वैचारिक वारसा सक्षमपणे पुढे नेण्यास सज्ज आहोत, असाच संदेश दिला आहे. विदीप जाधव यांच्या कुटुंबाची घेतली भेट २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा शब्द देत त्यांनी जाधव कुटुंबीयांना आधार दिला. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शपथविधीनंतरचा त्यांचा हा पहिलाच सातारा दौरा असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर