ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

छेडछाडीच्या भीतीमुळे प्रस्तावित वाईन शॉपला महिलांचा विरोध:व्यापारी संकुलात स्थलांतराचा डाव, महिलांसह नागरिकांचे उत्पादन शुल्कला निवेदन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील ‘यशोधन’ इमारतीसमोरील ‘टॉप टेन इम्पेरियल’ या व्यापारी संकुलात प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपच्या स्थलांतरास स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावित दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन िदले. उत्पादनशुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या जागेवर हे वाईन शॉप आणण्याचे नियोजन सुरू आहे, ते एक मोठे व्यापारी संकुल आहे. या परिसरात दिवसभर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या आणि उच्चभ्रू भागात दारूचे दुकान सुरू झाल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन व्यावसायिक वातावरणावर विपरित परिणाम होईल. या संकुलात आणि परिसरात महिलांच्या मालकीच्या अनेक व्यावसायिक आस्थापना आहेत. वाईन शॉप सुरू झाल्यास तळीरामांमुळे वाहतूक कोंडी, पार्किंगच्या समस्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. दारुड्यांमुळे छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची चिंता स्थानिक महिलांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांसमोर बोलून दाखवली. “दारूमुळे आधीच अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यामुळे नवीन दारू दुकानाला परवानगी देऊ नये, अशी भूमिका महिलांनी मांडली. आमदार अमोल खताळ आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या वाईन शॉपला येथे परवानगी मिळू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी अमर कतारी, आसिफ तांबोळी, शहरप्रमुख फैसल सय्यद, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, श्रीकांत खिची, लोक कतारी, शुभम काळे, आरती मसराम, लक्ष्मी खिची, रोशन गायकवाड, साधना शिवलकर, सुगरिता खिची, मोहिनी कतारी आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार व्यापाऱ्यांनी यापूर्वीच एकमताने ठराव करून अशा प्रकारच्या मद्य व्यवसायाला या परिसरात बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या आणि महिलांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित वाईन शॉपच्या स्थलांतराची परवानगी तात्काळ फेटाळावी; अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर