ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जून मध्यावर आला तरी तापमानातील उष्मा कायम:खबरदारी घेण्याची गरज, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची रोजच होतेय होरपळ, सूचनांवर लक्ष ठेवावे‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जून महिना अर्धा संपत आला तरीही उन्हाचा चटका कमी झालेला नाही. एक-दोन दिवसांचे अपवाद सोडले, तर गेल्या आठवडाभरापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा काहीसा रेंगाळल्यामुळे १ ते १३ जून या कालावधीत तापमानाचा पारा चढाच राहिला आहे. यंदा जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत अनेक भागांत, विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती कायम आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून उशिरा दाखल झाला होता. परिणामी १ ते १३ जून दरम्यान विदर्भाचे तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पहिल्या दोन आठवड्यांत कडक ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे (लू) नागरिक हैराण झाले होते. अजून दोन दिवस परिणाम जाणवतील. उन्ह चांगलेच तापत असल्यामुळे नागरिकांना जून महिन्यातही कान आणि डोके झाकूनच दैनंदिन कामे करावी लागत आहे. पुढील काही दिवस लाट अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट (हीटवेव्ह) जाणवू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, अल निनो व इंडियन ओशन डायपोल (आयओडी) या हवामान घटकांचा मान्सूनवर परिणाम होत असून यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर