ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नाशिकमध्ये महापाैरपदासाठी 10 महिला आग्रही:मात्र अंतिम फैसला हाेणार मुंबईतच, मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, 40 पैकी 16 नगरसेविका पात्र

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापौरपदाच्या शर्यतीत भाजपमधील 40 पैकी 10 नगरसेविका आग्रही असल्याने या पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित नाशिकच्या महापौर पदाबाबत निर्णय होणार असल्याचे जलसंपदा तथा नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत भाजपच्या कार्यालयात मंत्री महाजन यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचे सांगतानाच भाजप सरकाने 11 वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे देशाची प्रगती झाली असून आपण आता एक्स्पोर्टर झालो आहोत. 2047 मध्ये आपला देश आर्थिक महासत्ता असेल असा दावा त्यांनी केला. यावेळी आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रवक्ते गोविंद बोरसे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. व्यासपीठावर स्पर्धक नगरसेविका विराजमान महापालिका निवडणूकीत भाजपने 72 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी जाहीर झाल्याने भाजपच्या 40 पैकी 16 महिला या पदासाठी पात्र आहेत. पत्रकार परिषदेनंतर मंत्री महाजन यांना महापौरपदाबाबत विचारले असता या पदासाठी 10 महिला आग्रही असल्याचे सांगत यावरर मुंबईत निर्णय होईल,असे स्पष्ट केले. यावेळी मंत्री महाजन यांच्यासमवेत व्यासपीठावर महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या हिमगौरी आडके, स्वाती भामरे, डॉ. दीपाली कुलकर्णी व सुप्रिया खोडे विराजमान झालेल्या होत्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर