ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

एकनाथ खडसेंवर अजामीनपात्र वॉरंट:’कुकर्मांची फळे याच जन्मात भोगावी लागतात’ म्हणत अंजली दमानिया यांनी साधला निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील एका विशेष कोर्टाने भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी खडसेंवर निशाणा साधत कुकर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात, अशी टीका केली आहे. एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी व सुनावणी गत अनेक वर्षांपासून येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी या प्रकरणात आरोप निश्चिती होणार होती. पण खडसे दाम्पत्य या सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे कठोर आदेश दिले. यामुळे खडसे दाम्पत्याच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. काय आहेत खडसे दाम्पत्यावर आरोप? प्रस्तुत प्रकरणात ईडीने आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे 1 हजार पानांचे हे आरोपपत्र असून, त्यात खडसे कुटुंबीयांसह 3 खासगी कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात काळ्या पैशांचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2016 साली खडसेंनी माझ्यावर तब्बल 32 बदनामीचे खटले सहा जिल्ह्यांत केले. एकाच वेळी सगळ्या कोर्टांत हजर राहणं मानवी दृष्ट्या अशक्य होतं. केवळ तारीख चुकली म्हणून माझ्यावर Non-Bailable Warrant काढून दहशत निर्माण केली गेली. त्या काळात मानसिक छळ आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर मी शांतपणे सहन केला. कुकर्मांचे फळ चुकत नाही आज, वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर, त्यातले बहुतांश खटले संपुष्टात आले आहेत. आणि आता, यांच्यावरच Non-Bailable Warrant कोर्टाने काढला आहे. कुकर्मांचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात, ह्याच न्यायव्यवस्थेत, कर्मांची फळं भोगावीच लागतात. भोगा आपल्या कर्मांची फळं, असे दमानिया यांनी या प्रकरणी म्हटले आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना भाजपला तुम्ही ED लावली तर मी CD लावेल असा इशारा दिला होता. आता अजामीनपात्र वॉरंट आल्याने खडसे पुढचे पाऊल काय उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर