ब्रेकिंग न्यूज
⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं… ✦ ⚡ Government Employees News | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सणासाठी मिळणार 20 हजार रुपये ✦ ⚡ 61 तासांच्या संघर्षानंतर अखेर तोडगा! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार?
SP News Maregaon

Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर: दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. घरात सुख, समृद्धी नांदावी म्हणून माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी केरसुणी आणि झाडूची पूजा करण्याची देखील परंपरा आहे. लक्ष्मीपूजनाला केरसुणीच्या पूजेचे नेमके काय महत्त्व आहे? याबाबत गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लक्ष्मीचे आवाहन करणे हा एक सुंदर विधी असून आपल्याकडील सुंदर, उत्कट आणि दिव्य गोष्टींचे आपण पूजक असतो. मात्र हे करत असताना आपल्याकडील सर्व वाईट गोष्टी बाहेर काढणे गरजेचे असते. माणसाच्या मनातील मद, मत्सर, राग, द्वेष आणि क्रोध हे विकार बाहेर काढण्याचे व्यावहारिक साधन म्हणजे केरसुणी, झाडू, फडा किंवा खराटा होय.

Diwali 2026: लक्ष्मीपूजन कसे करावे? कोणत्या मंत्राचा जप करावा? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत, Video

लक्ष्मीच्या आगमनासाठी घरातील आणि मनातील अवगुण बाहेर काढणे आवश्यक असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला लक्ष्मीचेच एक छोटे स्वरूप मानून तिची पूजा करणे अत्यंत आवश्यक आणि आगत्याचे मानले जाते. केरसुनीच्या पूजेमुळे लक्ष्मी प्रसन्न होते, कारण ज्या ठिकाणाहून अवगुण जातात तिथे सद्गुणांचा वास होतो. मानवामध्ये अशा प्रकारे सद्गुण उद्दींगित व्हावेत आणि लक्ष्मी रूपी सद्गुणांची प्राप्ती व्हावी, यासाठी केरसुणीची पूजा करणे गरजेचे आहे. या पूजेमुळे सहजासहजी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे गुरुजी सांगतात.

केरसुनी किंवा फड्याची पूजा करत असताना सर्वप्रथम त्यावर पाणी शिंपावे, त्यानंतर हळद-कुंकू अर्पण करून फुले वाहवीत. यानंतर लाह्या, बत्तासे आणि रेवड्या अर्पण करून दिवा ओवाळावा आणि मगच तिच्या उपयोगास सुरुवात करावी. अशा प्रकारे केरसुनीची पूजा केल्यास घरात लक्ष्मी स्थिर नक्की राहते, असे गुरुजींनी सांगितले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर