ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झाडीपट्टीत ‘पिरतीचा’ धुमाकूळ:व्हॅलेंटाईन विकचा राडा अन्‌ गुलाबी थंडीत मायेचा पाडा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


फेब्रुवारी महिना सुरू झाला की शहरात गुलाबांच्या फुलांची चर्चा होते, पण आपल्या झाडीपट्टीत मात्र या ‘व्हॅलेंटाईन’ सणाचे वारे जरा वेगळ्याच ढंगात वाहू लागले आहेत. झाडीच्या मातीत आता फक्त नाटकांचे प्रयोगच नाही, तर ‘पिरतीचे’ प्रयोगही रंगताना दिसत आहेत. ​शहरात पोरं महागडी गुलाबं देऊन ‘प्रपोज’ करत असली, तरी झाडीपट्टीतल्या पोरानं आपल्या ‘गळमट्या’ (प्रियकर/प्रेयसी) साठी रानातली रानफुलं आणि रसरशीत बोरांची पिशवी साठवून ठेवली आहे. “व्हॅलेंटाईन-बॅलेंटाईन आम्हाले समजते न्हाई बापा, पण पिरतीचा हप्ता हाये म्हणून ऐकलं,” अशी भावना पुयारच्या एका तरुणाने बोलून दाखवली. ​झाडीपट्टीचा मुख्य कणा म्हणजे ‘नाटक’. या आठवड्यात होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगातही प्रेमाचे संवाद जोरात गाजत आहेत. नटांनीही स्टेजवरून “पिरतीचा रंग चढला” म्हणत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. तरुण मंडळी ‘व्हॉट्सॲप’वर स्टेटस ठेवण्यात दंग आहेत, तर वयस्कर मंडळी “आमच्या काळात हे चोचले नव्हते” म्हणत मिश्किलपणे हसत आहेत. ​सावधान! ‘काका-काकूं’चा पहाराही कडक ​एकीकडे प्रेमवीर आनंदात असले, तरी गावातील पारावर बसलेले ‘तज्ज्ञ’ काका आणि ओट्यावरच्या काकूंची नजर मात्र चोख आहे. “कोणाची पोरगी कोणासोबत फिरून राहिली,” यावर सीसीटीव्हीपेक्षाही कडक वॉच ठेवला जात आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन साजरा करताना झाडीतल्या पोरांना जरा ‘हुशारीने’ वागावे लागत आहे. ​एकूणच काय, तर झाडीपट्टीतला हा व्हॅलेंटाईन आठवडा म्हणजे केवळ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण नसून, त्यात झाडीचा आपुलकीचा आणि गावरान प्रेमाचा तडका आहे! आजकालची पोरं मेसेजवर प्रेम करतात प्रेम तं आमच्या रक्तांत आहे. झाडीपट्टीच्या नाटकांत आम्ही जेव्हा ‘प्रेम’ मांडतो, तेव्हा लोकं ढसाढसा रडतात अन् हसतातही. आजकालची पोरं मेसेजवर प्रेम करतात, पण खरं प्रेम तं नाटकाच्या ‘वन्समोअर’ मध्ये अन् त्या गुलाबी थंडीतल्या प्रयोगात असते. आमचा व्हॅलेंटाईन तं स्टेजवरच साजरा होते – युवराज प्रधान (प्रसिद्ध झाडीपट्टी कलावंत, गायक, निर्माता) रानातल्या मधासारखं प्रेम गोड असतं शहरातल्या पोरींना वाटते की गुलाबाचं फूल दिलं म्हणजे प्रेम झालं. पण आमच्या झाडीत, रानातल्या मधासारखं गोड प्रेम असते. नाटकाच्या दौऱ्यावर असताना घरच्यांची माया आणि प्रेक्षकांचं प्रेम हेच आमचं व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईनच्या दिवशी एखादा रोमँटिक प्रयोग असला की प्रेक्षकांची गर्दी पाहण्यासारखी असते. तोच आमचा खरा आनंद – करिश्मा मेश्राम, (सुप्रशिद्ध युवा नाट्य कलावंत) झाडीत ‘मजनू’ जिवंत आहेत मी मुंबईची असली तरी, झाडीपट्टीतल्या माय-बाप प्रेक्षकांनी आम्हाला जो मान दिला, तेच आम्हच खर प्रेम. नाटकाच्या ऐन तारखेवर जेव्हा कुणीतरी गुपचूप ‘गुलाबाचं फूल’ स्टेजवर फेकून मारते ना, तेव्हा समजते की झाडीत ‘मजनू’ जिवंत आहेत.! शहरातल्या कॅडबरीपेक्षा इकडच्या ‘बोरांच्या’ आदानानेच प्रेम वाढते. – सोनाली साळुंखे, मुंबई (अभिनेञी क्राईम पेट्रोल) झाडीची पोरं आता लै हुशार झालीत ​’व्हॅलेंटाईन’ म्हणजे आमच्यासाठी ‘प्रपंचातला गोंधळ’ हाये! बायको म्हणते मला हॉटेलत न्या, अन् तिकडं नाटकाचा प्रयोग हातात असते. पिरती करायची तं वाघासारखी करावी, लपून-छपून कायले? झाडीची पोरं आता लै हुशार झालीत, व्हॅलेंटाईनच्या दिवशी नाटकाच्या पासेस मागून ‘डेट’वर नेऊन राहिलीत. – दुधराम कावळे, विनोदी कलावंत झाडीपट्टी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर