ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भाजपचा गुजराती बालेकिल्ल्यातून मराठी हिंदू चेहरा:भाजपची स्मार्ट चाल यशस्वी; ठाकरे बंधुंना सडेतोड उत्तरासह पक्षाचा डबल फायदा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्रथमच आपल्या ताब्यात आणण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने शनिवारी महापौरपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रितू तावडे यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीने 114 चा बहुमताचा आकडा गाठल्याने रितू तावडे यांची महापौरपदी निवड ही औपचारिकता ठरणार, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर या पदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली होती. या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे अशी नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या निवडीला अनेक राजकीय अर्थ जोडले जात आहेत. रितू तावडे यांनी 2017 मध्ये घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 121 मधून प्रथमच महापालिकेत प्रवेश केला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले असून महिला मोर्चातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. सामाजिक आणि संघटनात्मक कामातून त्यांनी भाजपमध्ये आपली ओळख निर्माण केली. ईशान्य मुंबईत त्या आक्रमक आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेतील कामाचा अनुभव आणि संघटनातील भूमिका यामुळे त्यांची निवड पक्षासाठी सुरक्षित पर्याय मानली जात आहे. रितू तावडे ज्या वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आल्या आहेत, तो भाग गुजरातीबहुल म्हणून ओळखला जातो. विद्याविहार पूर्व, गारोडिया नगर, सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालय परिसर या वॉर्डमध्ये येतो. येथे गुजराती आणि जैन समाजाची मोठी वस्ती आहे आणि हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील असलेल्या रितू तावडे यांना या वॉर्डमधून निवडून आणत भाजपने महापौरपदासाठी पुढे केले आहे. एकाच वेळी दोन संदेश या निर्णयातून भाजपने एकाच वेळी दोन संदेश दिल्याची चर्चा आहे. मराठी चेहरा महापौरपदी बसवून मराठी मतदारांना संदेश देण्यात आला, तर गुजराती-जैन मतदारांचा विश्वास कायम ठेवण्यात आला. गुजराती मतदारांनी निवडून दिलेल्या मराठी उमेदवाराला महापौर बनवून भाजपने राजकीय समीकरणे चतुराईने जुळवली आहेत. त्यामुळे या निवडीकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय रणनीती म्हणूनही पाहिले जात आहे. पक्षाने संतुलन साधले महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने मराठी महापौर, हा मुद्दा पुढे करत भाजपवर टीका केली होती. भाजपने सुरुवातीला हिंदू महापौर, असा उल्लेख केला होता. मात्र, त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आता रितू तावडे यांच्या रुपाने मराठी चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे संभाव्य वाद टाळत पक्षाने संतुलन साधले आहे. तावडे यांची निवड सत्तेची पहिली छाप मुंबईच्या राजकारणात हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भाजपने पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता मिळवली असून आता महापौरपदी रितू तावडे यांची निवड ही त्या सत्तेची पहिली छाप ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार कसा चालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर म्हणून त्या प्रशासन आणि सभागृहात आपली भूमिका कशी निभावतात, यावर पुढील राजकीय समीकरणेही अवलंबून राहणार आहेत. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून रीतू तावडे, शिवसेनेकडून संजय खाडी रिंगणात:संघटनात्मक ताकद, राजकीय गणित लक्षात घेऊन निवड कोण आहेत मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे:सभागृहात चार माजी महापौरांचे आव्हान; म्हणाल्या- मुंबईची सेवक म्हणून काम करणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर