ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

माझे मन अत्यंत जड झालेय..:अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी CM देवेंद्र फडणवीस भावुक, अजितदादांच्या स्मरणार्थ दोन मोठ्या घोषणा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या नावाने दोन मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळणारे अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. अजितदादांच्या नावे नागरीसेवा पुरस्कार देण्यात येणार पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरीसेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा अर्थसंकल्प समर्पित करतो, असे फडणवीस यांनी म्हटले. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचे अपघाती निधन दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, सकाळी पावणे नऊच्या सुमारास धावपट्टीवर उतरताना विमानाने पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या विमानामध्ये अजित पवारांसह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे सर्वजण प्रवास करत होते आणि या सर्वांचाच या अपघातात अंत झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर