ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजितदादांच्या अपघाताप्रकरणी FIR दाखल करून घेतला नाही:रोहित पवार म्हणाले- कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी, VSR ला वाचवण्याचा प्रयत्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आणि आमदारांचे असे असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला. रोहित पवार, अमोट मिटकरी यांच्यासह अजित दादां आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, हा एफआयआर पोलिसांनी दाखल करून घेतला नाही. पोलिसांसोबत झाली बाचाबाची रोहित पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला आमचा वादविवाद झाला. मात्र, त्यांनी लॅपटॉप आणला. माझं स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात आली. मात्र, एक बडे पोलिस अधिकारी आले. त्यांनी त्यांनी एफआयआर करण्यापासून थांबवलं. त्यांनी आम्हाला का थांबवलं? या पोलिस अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला?, असा प्रश्न असून आमचा संशय बळावत चालला आहे. आम्हाला राज्य सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यानुसार एफआयर दाखल करण्याचा अधिकार आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘आता उद्या सकाळी दहा वाजता बारामतीमध्ये ‘एफआयआर’ दाखल करायचा प्रयत्न करणार आहोत. ती बिल्डिंग दादांनी बांधली आहे. तिथं नाही झालं, तर न्यायालयात जाऊ. ती बिल्डींगही दादांनी बांधलीय. आमदारांची अशी अवस्था रोहित पवार म्हणाले की, ‘विखे-पाटील, आशिष शेलार, साताऱ्याचे मंत्री, त्यांचे ट्रोलर ट्रोल करतात. आज पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत. कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय पोलिस अधिकाऱ्यांना अशी मग्रुरी येत नाही. लाखो लोकांच्या आमदारांची अशी अवस्था असेल, तर इतरांचे काय? कोण अडथळे आणत आहेत, कोण नेते आहेत, बघणार,’ असे रोहित पवार म्हणाले. मात्र, मुंबई पोलिसांनी आपण रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून, त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. पोलिस कुणाच्या दबावाखाली? राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि आमच्याकडे या प्रकरणात घातपात झाल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही पोलिस अद्याप एफआयआर (FIR) दाखल का करत नाहीत? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे. या दुर्घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून घातपाताचा संशय बळावणारे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. वारंवार मागणी करूनही आणि पुरावे देऊनही पोलिस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत जर पोलिस इतकी दिरंगाई करत असतील, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार? व्हीएसआर’ (VSR) या विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे. तपासाची दिशा भरकटवून कंपनीला क्लीन चिट देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस नक्की कोणाच्या दबावाखाली आहेत आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे जनतेला समजले पाहिजे. अजितदादांचा घात डिजिसीएने जाणीवपूर्वक घडवून आणला का?:अमोल मिटकरी झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा प्रयत्न असेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. अपघातानंतर एक महिन्याने अहवाल देण्यात आला, तर ब्लॅक बॉक्स तीन आठवड्यांनंतर सापडला. सुमित कपूर संदर्भात डिजिसीएने एक शब्दही उच्चारला नाही, अशी टीका त्यांनी केली. या कारवाईवर आम्ही समाधानी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर