ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोलापुरात केवळ डान्सबारच नव्हे तर शहरात जागोजागी मटक्यांचेही अड्डे:त्यांना पोलिस, नेत्यांचे अभय, आ. देशमुखांच्या विधानसभेतील आरोपानंतर अवैध धंद्यांची पुन्हा चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर शहर व जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून राजरोस डान्सबार सुरू आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या संगनमताने ते सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या निमित्ताने शहरातील अवैध धंदे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मात्र केवळ डान्सबारच नव्हे तर शहरात पोलिसांच्या डोळ्यादेखत मटक्याचे अड्डेही जागोजागी सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. याचे कारण म्हणजे या अवैध धंद्यांना केवळ पोलिसांचेच नव्हे तर राजकीय नेत्यांचेही अभय आहे. राजकीय नेते अशा लोकांकडून गैरमार्गाची कामे करून घेतात तर पोलिसांना या लोकांकडून रग्गड वरकमाई मिळते, त्यामुळे दोघांचेही या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष आहे. काही पोलिसही अशा धंद्यांत सहभागी आहेत. यात सर्वसामान्य माणूस, कष्टकरी मात्र आर्थिकदृष्ट्या उद‌्ध्वस्त होतोय. आमदार सुभाष देशमुखांनी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही मटका, डान्सबारचा मुद्दा उपस्थित केला होता. पण त्याकडे ना पालकमंत्र्यांनी लक्ष दिले ना पोलिस प्रशासनाने. त्यामुळे त्यांनी आता थेट विधानसभेत हा प्रश्न मांडला. पण मुख्यमंत्र्यांसह गृह राज्यमंत्र्यांनीही त्याला गोलगोल उत्तर दिले. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने बुधवारी शहरातील विविध भागात पाहणी केली असता अनेक सार्वजनिक ठिकाणी अगदी पानटपऱ्यावर मटक्यांचे अड्डे सुरू असल्याचे दिसून आले. 1. रेल्वे स्टेशन परिसर स्टेशनच्या समोरील गाळ्यांमध्ये मटक्याचे अड्डे राजरोस सुरू आहेत ऑटो रिक्षा, चहाचे गाडे उभे असतात त्याच्या बाजूला पडदे लावून मटका व जुगार चालू असतो. इथे वाहतूक पोलिस उभे असतात, पण ते सोयीस्कर डोळेझाक करतात. प्रवाशांना हे लोक आकर्षित करून त्यांची लूट करतात. त्यांची दहशत इतकी आहे की, तक्रार करण्याचे धाडसही कुणी करू शकत नाही. 2. भय्या चौक
डॉ. कोटणीस स्मारकाच्या बाजूला एक पिवळ्या रंगाची टपरी आहे. तिथे मटक्याचे आकडे घेतले जातात. या टपरीत एका पाटीवर रोज ओपन, क्लोजचे आकडे लिहिलेले असतात. याच स्मारकाच्या भिंतीला लागून अजून एक- दोन टपऱ्यांवर असाच आकड्यांचा खेळ चालतो. इथे नियमित येणारा कामगार वर्ग अशा अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला दिसतो. 3. कुमठा नाका उद्यान
ग्रामीण जिल्हा रुग्णालयाच्या समोरील उद्यानाच्या जवळच शेड वजा टपरीमध्ये मटक्याचे आकडे घेतले जातात. या ठिकाणी यूपीआयद्वारे (क्यूआर कोड) पैसे घेतले जातात. इथे दुसरा व्यवसाय दाखवण्यासाठी मिनरल वॉटरच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र टपरीच्या आत पाटीवर खडूने ओपन, क्लोजचे आकडे राजरोस लिहिलेले असतात. 4. सिव्हिल हॉस्पिटल परिसर
समोरील चौकात व मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच काही टपऱ्यावर खुलेआम आकडे घेतले जातात. रुग्णालयात आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेले ग्रामीण भागातील लोक फावल्या वेळेत मटक्याच्या टपरीवर जाऊन पैसे खर्च करतात. इथेही पोलिसांची ये- जा असते, पण त्यांना आजवर हे अड्डे दिसलेले नाहीत, हे विशेष. मनपा निवडणुकीत अनेक नेत्यांची अवैध धंदेवाल्यांशी सलगी उघड पोलिसांच्या वरदहस्तामुळे अवैध धंदे सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचेही त्यांच्याशी ‘सलोख्या’चे संबंध आहेतच. मनपा निवडणुकीवेळी काही पक्ष कार्यालयात ‘मटका किंग’चा राजरोस वावर होता. काही नेत्यांनी तर यापूर्वी तडीपार झालेल्या गुंडांच्या सत्कार सोहळ्यांनाही हजेरी लावली. काहींनी जिंकण्याचे गणित लावून अवैध धंदेवाल्यांना पक्षप्रवेशही दिले. त्यापैकी काहींना तिकिटेही दिली. त्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या, पण नेत्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मतदारांनी मात्र अशा अवैध धंदे करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करून घरचा रस्ता दाखवला. अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच : पोलिस आयुक्त पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, अवैध धंद्यांविरुद्ध आमची मोहीम तीव्र आहे. गेल्या वर्षभरात जुगाराचे 712, दारूबंदीचे 1244 आणि अंमली पदार्थाचे 45 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमच्यावर कुणाचा दबाव नाही. आम्ही नियमित कारवाई करत आहोत.’ मटका चालवणारा 57 वर्षीय अरुण रोडगे तडीपार नागरिकांना मारहाण, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मटका- जुगार चालवणे, दहशत निर्माण केल्याचे गुन्हे दाखल असलेल्या अरुण प्रभाकर रोडगे (वय 57, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यास पोलिसांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. अरुणविरुद्ध सन 2023 ते 2026 या कालावधीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी 25 फेब्रुवारी रोजी त्याच्या तडीपारीचे आदेश काढले. जुने ‘हिशेब’ चुकते करण्यासाठी देशमुखांनी मुद्दा मांडल्याचे कारण देशमुखांच्या आरोपामागेही राजकीय कारण असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मनपा निवडणुकीवेळी देशमुख यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जात होता. त्यांच्याच पक्षातील नेत्याचे हे कारस्थान आहे, असा त्यांना संशय होता. त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला फोन करून कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकला, पण अधिकाऱ्याने न ऐकता कारवाई केली. हा राग मनात धरून देशमुख हिशेब चुकता करत असल्याची माहिती त्यांनी दिली. काहीही असले तरी देशमुखांनी रास्त मुद्दा मांडल्याची लोकभावना आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर