ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे खुले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक (पुणे) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-बार्शी यांच्या वतीने आयोजित प्रा. व. न. इंगळे पुरस्कृत राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले होत्या. यावेळी रमेश पाटील व ॲड. सतीश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन म. सा. प. अध्यक्ष पां. न. निपाणीकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रविराज फुरडे यांनी केले, तर सूत्रसंचालन नीता देव यांनी केले. बी. आर. देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश गव्हाणे, आबासाहेब घावटे, प्रकाश महामुनी, दिलीप कल्याणी, शारदा पानगावकर, प्रा. कल्याण घळके, सुवर्णा शिवपुरे, मंगल माळी, प्रदीप कुमार कांदे, गिरीश सोनार, सिद्धेश्वर धुमाळ, मयुरी बाबर आणि प्रदीप गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी आणि साहित्यिका डॉ. स्मिता पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच बार्शीतील ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ कोळेकर आणि सुमन चंद्रशेखर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यांचा सन्मान

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर