ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

6 बंडखोर खासदारांचा आजच शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश:लोकसभेतील संख्याबळ 13 वर जाणार– प्रताप सरनाईक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरनाईक म्हणाले की, आज दुपारी 3 वाजता सहा खासदार अधिकृतपणे शिवसेनेत सामील होतील. त्यामुळे लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या 7 वरून 13 होईल. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आणखी वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले होते. आता प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर या राजकीय घडामोडींवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. आमचे संख्याबळ ७ वरून १३ होणार
मंत्री प्रताप सरनाईक यांनी वेळ आणि आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले, “आज दुपारी ३ वाजता सहा खासदार अधिकृतपणे शिवसेनेत सामील होतील. या नवीन खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या आता ७ वरून थेट १३ वर पोहचेल. या ऐतिहासिक वाढीमुळे शिवसेनेचे संख्याबळ आणि ताकद संसदेत प्रचंड वाढली आहे.व ठाकरे यांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरणार आहे. भाजपने संविधान बदलण्यासाठी त्यांना पैशाच्या जोरावर फोडले
विशेष म्हणजे, आज सकाळीच आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडणाऱ्या या ६ खासदारांवर अत्यंत गंभीर आणि तिखट शब्दांत आरोप केले होते. “हे लोक बंडखोर नसून ‘डरपोक आणि विकाऊ’ आहेत. भाजपने संविधान बदलण्यासाठी त्यांना पैशाच्या जोरावर फोडले आहे,” असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला होता. विधान परिषद निवडणूक निकाल: महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सविस्तर वाचा गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली: नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,” असे राऊत यांनी सांगितले. सविस्तर वाचा नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर