ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

MIM नगरसेवक मतीन पटेलचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल:तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप; कारवाईची मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी वादात सापडलेले एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन खान यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते एका तरुणीला व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्याचा इशारा देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका संयुक्त कारवाईत निदा खानला अटक केली. निदा खान ही नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव परिसरातील एका घरात लपून बसली होती. हे घर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. आता मतीन पटेल यांच्यावर निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. यामुळे मतीन पटेल यांचा पाय खोलात गेल्याची चर्चा असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काय आहे वादग्रस्त व्हिडिओत? वादग्रस्त व्हिडिओ सकल हिंदू समाज मुंबई या फेसबुक पेजवरून व्हायरल करण्यात आला आहे. त्यात मतीन पटेल व एक तरुणी दिसून येत आहे. व्हिडिओत मतीन हा सदर तरुणीला कपडे काढण्याची सूचना करतो. त्यानंतर ती तरुणी तो सांगेल त्या प्रमाणे करते. सकल हिंदू समाजाने या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त करत मतीन पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मतीन पटेल यांनी सदर तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून असे कृत्य करून घेतल्याचा आरोप यासंबंधी केला जात आहे. तसेच त्यांची नगरसेवक पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही या प्रकरणी केली जात आहे. या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही मतीन पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. आत्ता पाहू कोण आहे मतीन पटेल? मतीन पटेल हा एमआयएमचा नगरसेवक आहे. निवडणूक काळातही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. मतीन पटेल हा एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांपैकी एक असल्याचे मानले जाते. मतीन पटेल MIM साठी ठरणार डोकेदुखी नाशिक टीसीएस प्रकरणातील गंभीर आरोप आणि व्हायरल व्हिडिओमुळे एमआयएम पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यताही यासंबंधी व्यक्त केली जात आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी आपल्या वर्तनाची जबाबदारी ओळखली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे, संबंधित व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील नेमकी पार्श्वभूमी समोर येणे आवश्यक असल्याचे मतही काहींकडून मांडले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर