ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राऊतांनी राज्यसभेसाठी आदित्य ठाकरे-प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट केला:मविआमध्ये काँग्रेसची अवस्था ‘कढीपत्त्या’सारखी- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट केला. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की शरद पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत, राऊत हे पहिल्या दिवसापासून हेच सांगत होते कारण शरद पवार यांचे नाव पुढे करायचे आणि आदित्य ठाकरे आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा हे धोरण संजय राऊत यांचे होते, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी काही लढा दिला नाही, त्यांनी केवळ स्वत:ला प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. अजित पवारांचा वारसा आपल्याकडे मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी ते रोज पत्रकार परिषद घेत आहेत. राऊतांनी गुरूज करण्याचे काम रोहित पवारांनी केले आहे. ते जसे रोज सकाळी भोंगा वाजवतात पुरावे नसताना तसेच रोहित पवारांचा धंदा झाला आहे ते हे प्रसिद्धीसाठी करतात का? ठाकरे गटात अंतर्गत गटबाजी नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शरद पवारांचे नाव पुढे करत आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांना दूर करण्याचे काम राऊतांनी केले आहे. चतुर्वेदींना संधी मिळाली तर पुढच्यावेळी आपला पत्ता कट होईल म्हणून त्यांनी त्यांना दूर केले. कारण चतुर्वेदी या आदित्य ठाकरेंच्या गटातील आहेत. आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचे काम राऊतांनी केले आहे. काँग्रेसला काही मिळणार नाही नवनाथ बन म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांची कितीही इच्छा असली की राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी तरी सुद्धा काँग्रेसला मविआत कढीपत्तासारखे स्थान आहे. त्यांचा वापर करत बाजूला फेकून दिले जाते. त्यांना ना राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे ना त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे. राज्यसभेसाठी शरद पवार, तर उबाठाकडून विधान परिषदेवर दावा करण्यात येत आहे. काँग्रेसला काहीही मिळणार नाही. मविआत वाद सुरू नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये तिन्ही पक्षामध्ये वाद आहेत. मविआतील 3 पक्षाचे तोंड 3 दिशेला आहेत. प्रत्येकाला आपला खासदार व्हावा, आपला आमदार व्हावा असे वाटत आहे. पण मविआही विचारांची लढाई लढणारी नाही तर केवळ सत्तेसाठीची आहे. मविआच्या ठिकऱ्या उडायला लागल्या आहेत. त्यांना राज्यात काहीही किंमत नाही. 50 जागा तिघांना मिळून निवडून आणता आलेल्या नाहीत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर