ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

संत्रा उत्पादकांचे प्रति हेक्टर एक लाख मदतीसाठी तहसील कार्यालयात ठिय्या:वरूड तालुक्यात गारपिटीने संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात ३० व ३१ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच एप्रिल व मे महिन्यातील ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे फळगळ झालेली असताना, त्यानंतर झालेल्या गारपिटीने उरलेली फळेदेखील झाडांवरून खाली पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर किसान न्याय हक्क संघर्ष समिती व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करत शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून वरूड तालुका गारपीटग्रस्त घोषित करावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, आंबिया बहार संत्रा व मोसंबी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. खत, औषधे, मजुरी आणि सिंचन यासाठी लाखो रुपये गुंतवणूक केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण उत्पादन धोक्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असून, शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय पुढील हंगामाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येईल तसेच नुकसानीची माहिती वरिष्ठ स्तरावर पोहोचवून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा किसान न्याय हक्क संघर्ष समिती व शेतकरी यांनी दिला. या आंदोलना दरम्यान वरूड तालुका तत्काळ गारपीटग्रस्त घोषित करावा, संत्रा व मोसंबी उत्पादकांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची मदत द्यावी, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. गारपिटीच्या दुहेरी फटक्याने संत्रानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आता शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पावडे, उपसभापती बाबा मंगुळकर, माजी संचालक सुधाकर दौड, संचालक गणेश खर्डे, माजी नगरसेवक धनंजय बोकडे, किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे स्वप्निल खांडेकर, राजेश डवरे, देवेंद्र शेडके चंद्रकांत बोडनासे, शेतकरी उपस्थित होते. तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करताना शेतकरी. संत्रा उत्पादकांच्या मागण्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून वरूड तालुका गारपीटग्रस्त घोषित करावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी,नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे केल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर