ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भाजपने मानले उत्तर भारतीयांचे आभार:प्रवीण दरेकर म्हणाले – BJP मुंबई तोडणार नाही जोडणार; मराठी-हिंदी भाषकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना निकालाने उत्तर दिले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर हिंदीभाषक आणि उत्तर भारतीयांचे आभार मानले. भाजप मुंबई तोडणार नाही, तर ती जोडणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजयी झाले. या विजयानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिव्य मराठीशी बोलताना दिली. मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिले. इथे सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, हे दाखवून दिले, असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता हाणला. प्रचंड आनंद देणारा विजय भाजप नेते प्रवीण दरेकर दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले की, आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम आणि देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा असणारा विश्वास हा या ठिकाणी दिसला. त्यामुळे हा विजय आम्हाला प्रचंड आनंद देणारा असा आहे.’ तेढ निर्मितीचा प्रयत्न फसला भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. खरे म्हणजे मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिलं उत्तर भारतीय सुद्धा आमच्यासोबत इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उत्तर भारतीयांनी दाखवलं या मातीनं आम्हाला मोठें केले आहे. या मातीचा सन्मान केला पाहिजे.म्हणून ते ही आमच्याबरोबर आहेत. उपकाराचे प्रचंड बरडन भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘भाजप मुंबई तोडणार नाही. आम्ही मुंबई जोडणार आहोत. मुंबई आता आम्ही जोडलेली आहे. याही पुढे जाऊन आमचे मुंबई मिशन आमचे सगळे नगरसेवक रांगेत जिंकून येत आहेत. आमचे हर्षद कारकर आहेत. उमेदवार संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडी आहेत. हे ताकदीने त्या ठिकाणी उभे राहिले. महायुतीचा परिवार म्हणून आम्ही हा वेगळा आनंद सध्या उपभोगतो आहेत आणि मुंबईकरांचे उपकार कसे फेडायचे याचे बरडन आमच्या मनावर आहे.’

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर