ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण:रोहित पवारांचा मोठा दावा, अखिलेश यादवांची भेट घेत संसदेत आवाज उठवण्याची मागणी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी खळबळजनक दावे केले आहेत. “अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? हा आमचा साधा प्रश्न आहे,” असे विचारत त्यांनी थेट ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले आहे. बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी तांत्रिक बाबींवर बोट ठेवले. ते म्हणाले, “अपघाताच्या दिवशी दृष्यमानता (Visibility) ५ हजारच्या खाली असताना कॅप्टन कपूर यांनी व्ही. के. सिंग यांना फोन केला होता. ‘व्हिजिबिलिटी खराब आहे, मी उड्डाण करू शकत नाही’ असे वैमानिकाने स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यावर व्ही. के. सिंग यांनी ‘तू टेकऑफ कर, बाकी नंतर पाहून घेतो’ असा आदेश दिला. सीआयडीने व्ही. के. सिंग यांचे कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासले, तर हे संभाषण समोर येईल.” वैमानिकावर दबाव होता का? वैमानिक कपूर यांच्याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, “कपूर पूर्वी मद्यप्राशन करायचा याचे पुरावे आम्ही दिले आहेत. मात्र, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांचे विमान उडवत असताना त्याच्या रक्तात दारू, ड्रग्ज किंवा विष आढळलेले नाही. मग जर तो शुद्धीवर होता आणि व्हिजिबिलिटी कमी होती, तर त्याने उड्डाणाचे धाडस का केले? त्याच्यावर कुणाचा दबाव होता का? याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. व्ही. के. सिंग स्वत:हून पुढे येऊन मीडियासमोर काही सांगत असेल, तर त्याला पुराव्यानिशी प्रत्युत्तर देऊ, असे रोहित पवार म्हणाले.” बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंग यांना संरक्षण व्ही. के. सिंग यांना जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी ‘राजस्थान कनेक्शन’ उघड केले. “व्ही. के. सिंगचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नात कुणीही जाऊ शकतो, हे मी समजू शकतो. पण आज जे सत्तेत आहेत, ते लोक रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथे लग्नात अहुजा नावाचा सिंगर गाणे गात असताना प्रफुल पटेल तर होतेच, त्याचबरोबर त्यांचा मित्र एस. एन. शर्मा हा देखील त्या लग्नाला होता. यासोबतच अनेक मोठमोठे नेते देखील होते. मी प्रफुल पटेलांना विनंती केलीये की, तुम्ही जर अजितदादांच्या जवळचे असाल, आणि तुम्ही त्या लग्नाला होताच, तर त्या लग्नात आणखी कोण होते? त्यांची लोकांना समोर येऊन सांगा. लग्नात असणारी लोक पॉवरफुल आहेत. ही लोक रोहित सिंगच्या लग्नात जात असतील, तर १०० टक्के कुठे ना कुठे व्ही. के. सिंग, रोहित सिंग आणि व्हीएसआरला याच मोठ्या नेत्यांकडून वाचवले जात असल्याचे सिद्ध होते,” असा दावा रोहित पवारांनी केला. व्ही. के. सिंगला ताब्यात घेतल्यास मोठी नावे समोर येतील मी सातत्याचे सांगतोय की, मला व्ही. के. सिंग आणि व्हीएसआरचे काही देणेघेणे नाहीये. पण व्हीएसआरच्या विमानात अजितदादा प्रवास करत असताना, विमान हे पाडण्यात आले की पडले? हा माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. व्ही. के. सिंगचा तपास ज्या दिशेने चाललाय त्यावरून त्याला वाचवले जात असल्याचे आम्हाला वाटत आहे. कारण व्ही. के. सिंगला ताब्यात घेतले, तर तो काही लोकांची नावे घेईल. त्यामुळे काही लोकांना भीती वाटतीये, असे आम्हाला वाटत आहे. सीआयडी तपासावर प्रश्नचिन्ह आम्हाला मिळणारी माहिती पत्रकारांकडून, आमच्या काही एजन्सीकडून कळते. व्हीएसआरच्याच काही लोकांकडूनही ही माहिती कळते. अजिदादांच्या हितचिंतक लोकांकडून देखील कळते. ही माहिती फक्त आम्ही पुढे आणतोय. त्यावर शहानिशा करणे, त्याचा तपास करणे हे सीआयडीचे काम आहे. जर व्हिजिबिलीटी ५ हजारच्या खाली असते, तर कुठलाही पायलट विमान उडवत नाही. मग कॅप्टन कपूरला एवढी हिंमत आली कशी? तेवढे धाडस कसे झाले? धाडस देणार व्ही. के. सिंग होता का? असा प्रश्न निर्माण होतो, असेही रोहित पवार म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर