ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव:शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्या मुलाचा आरोप; भाजपच्या एका विशिष्ट टोळीवर साधला निशाणा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागलेल्या शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव झाला. माझ्या विरोधात विरोधी 2 पक्षांच्या पक्षप्रमुखांची मुले प्रचार करत होती. पण भाजपच्या एकाही नेत्याने मला मदत केली नाही. उलट माझा प्रचार करू नका असा अपप्रचार ते करत होते, असे सरवणकर यांनी म्हटले आहे. समाधान सरवणकर हे शिंदे गटाचे बडे नेते तथा सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत. ते मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 194 मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता त्यांनी आपल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, माझ्या प्रभागात माझ्या विरोधात 4-5 आमदार प्रचार करत होते. विरोधी बाकावरील 2 पक्षांच्या पक्षप्रमुखांची मुले माझ्या मतदारसंघात प्रचारात उतरली होती. त्यांचे मुख्य टार्गेट मी होतो. त्यानंतरही मतदार माझ्यासोबत उभे राहिले. पण माहीम विधानसभेत मला भाजपची कोणतीही मदत झाली नाही. भाजपचे विशिष्ट एक पदाधिकारी होते. त्यांनी सर्वांना सांगितले की, यांना मदत करू नका. आपल्याला काहीतरी आले असल्याचा मेसेज त्यांनी व्हॉट्सएपवरून व्हायरल केला. त्यामुळे आम्हाला माहीममध्ये कुणीही मदत केली नाही. व्हॉट्सएप चॅटमध्येही लिहिण्यात आले होते की, आपल्याला यांचे (समाधान सरवणकर) काम करायचे नाही. आपल्याला त्यांचा पराभव करायचा आहे, असे ते म्हणाले. प्रभादेवीत भाजपची विशिष्ट टोळी सक्रीय समाधान सरवणकर पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही भाजपची एक विशिष्ट टोळी महायुतीचा उमेदवार कसा पराभूत होईल यासाठी काम करत होती. त्यानंतर यंदाच्या महापालिका निवडणुकीतही या टोळीने भाजपच्या शीतल गंभीर यांचाही पराभव कसा होईल यासाठी काम केले. पण शीतल गंभीर विजयी झाल्या, तर प्रिया सरवणकर यांचा पराभव झाला. या पराभवामागेही भाजपची हीच टोळी कार्यरत होती. भाजप अशा पद्धतीने काम करेल याची कल्पना आम्हाला नव्हती. हीच टोळी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविषयीही घाणेरड्या भाषेत बोलत होती. या टोळीने पक्षाचा आदेश डावून काम केले. त्यामुळे आम्ही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमची बाजू मांडणार आहोत. पक्षाचे लेबल असल्यामुळे त्या व्यक्तीचे ऐकले जात आहे. पण त्यांनी निवडणुकीत आम्हाला कोणतीही मदत केली नाही. या व्यक्तीविषयी आम्ही कळवण्याच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वरिष्ठांना कळवले होते, असा दावाही समाधान सरवणकर यांनी केला आहे. सरवणकरांच्या पराभवावर ठाकरे गटाने व्यक्त केला होता आनंद समाधान सरवणकर यांच्या पराभवावर ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी आनंद व्यक्त केला होता. मी प्रभादेवीमधून सरवणकरांचे नाव पुसून टाकण्याची शपथ घेतली होती. ज्यांनी बाळासाहेबांना व उद्धव ठाकरेंना त्रास दिला, त्यांना जनतेने धडा शिकवला. मी 2017 च्या महापालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो. पण त्यावेळी माझा पराभव झाला. तेव्हा त्यांनी माझ्या घरापुढे नारळ फोडले होते. आता मी त्यांच्या हातात हातात नारळ देणार आहे, असे ते म्हणाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर