ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पाण्याच्या शोधामध्ये व्याकुळलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला:वन विभागाचे अधिकारी आलेच नाही, प्राणीमित्रांनीच नेले वन कार्यालयात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर परिसरात शुक्रवारी २२ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाढत्या उष्णतेमुळे व पाण्याच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर पडलेल्या एका हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुदेव नगर येथील पाण्याच्या टाकीमागील भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भटकंती करत असलेल्या हरणाच्या पिल्लाला कुत्र्यांच्या कळपाने घेरले व त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. या दरम्यान कुत्र्यांनी पिल्लाच्या पायचे पोटाचे लचके तोडल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व प्राणीप्रेमींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी जखमी पिल्लाला कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, उपस्थित नागरिक व प्राणी मित्रांनी तत्काळ तिवसा वन विभागाला सदर घटनेची माहिती दिली. मात्र, तब्बल दीड तास उलटूनही वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये यादरम्यान नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर प्राणी मित्रांनीच पुढाकार घेत जखमी हरणाच्या पिल्लाला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन तिवसा येथील वन विभाग कार्यालयात नेले. सध्या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत आटत चालले असून वन्यजीवांना पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. परिणामी अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाने जखमी हरणाच्या पिल्लावर तातडीने उपचार करावेत तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर