ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दादा तुमची उणीव शब्दांत मांडता येणार नाही:प्रताप सरनाईकांचे अजित पवारांना भावनिक पत्र, 35 वर्षांचा ऋणानुबंध अन् शेवटच्या भेटीची आठवण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना, त्यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या लाडक्या ‘दादां’ना उद्देशून एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावूक पत्र लिहिले आहे. “दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही,” अशा शब्दांत सरनाईक यांनी आपल्या ३५ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांना एक जाहीर पत्र लिहून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. राजकारणातील एका मार्गदर्शकाच्या जाण्याने आपण पोरके झालो. दादा तुमची उणीव शब्दांत मांडता येणार नाही, अशा शब्दांत प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून भावना व्यक्त केल्या. प्रताप सरनाईकांनी लिहिलेले पत्र जशास तसे… प्रिय अजितदादा, आज हे पत्र लिहिताना,वेळ थांबलेली वाटते, परंतु आठवणी कायम असणार… मन अजूनही मान्य करायला तयार नाही की तुम्ही आपल्यात नाहीत. गेली ३० – ३५ वर्षे तुमच्यासोबतचा प्रवास माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. विद्यार्थी संघटनेचा एक साधा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा तुमच्यासमोर आलो, तेव्हा मी युवक काँग्रेस, ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली होती. दादा, बारामतीला आलो की तुमच्यासोबतच्या भेटीगाठी फक्त राजकारणापुरत्या कधीच नव्हत्या. काम कसं करावं, स्वच्छता कशी ठेवावी, आणि माणसांशी नातं कसं जपावं हे सगळं मी तुमच्याकडून शिकलो. तुमचं प्रेम मनापासून असायचं. “प्रतापला मदत करायचीय,” असं तुम्ही हसत म्हणायचात, आणि मी मागे वळून पाहिलं की तुमचं भक्कम पाठबळ कायम माझ्या पाठीशी उभं असायचं. तुमची मुलं मित्र आहेतच परंतु पवार कुटुंबाशी देखील अत्यंत जवळचे संबंध देखील आहेत. कारण नाती कशी जपायची हे तुम्ही केवळ सांगितलं नाही, तर जगून दाखवलंत. प्रिय अजितदादा, आज हे पत्र लिहिताना, वेळ थांबलेली वाटते. परंतु आठवणी कायम असणार…मन अजूनही मान्य करायला तयार नाही की तुम्ही आपल्यात नाहीत. गेली ३० – ३५ वर्षे तुमच्यासोबतचा प्रवास माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. विद्यार्थी संघटनेचा एक साधा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा तुमच्यासमोर आलो, तेव्हा मी युवक काँग्रेस, ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली होती. दादा, बारामतीला आलो की तुमच्यासोबतच्या भेटीगाठी फक्त राजकारणापुरत्या कधीच नव्हत्या. काम कसं करावं, स्वच्छता कशी ठेवावी, आणि माणसांशी नातं कसं जपावं हे सगळं मी तुमच्याकडून शिकलो. तुमचं प्रेम मनापासून असायचं. “प्रतापला मदत करायचीय,” असं तुम्ही हसत म्हणायचात, आणि मी मागे वळून पाहिलं की तुमचं भक्कम पाठबळ कायम माझ्या पाठीशी उभं असायचं. तुमची मुलं मित्र आहेतच परंतु पवार कुटुंबाशी देखील अत्यंत जवळचे संबंध देखील आहेत. कारण नाती कशी जपायची हे तुम्ही केवळ सांगितलं नाही, तर जगून दाखवलंत. जुलै २००८ मधला सिद्धिविनायक मंदिरातील तो दिवस, रत्नजडीत मोबाईलचा तो प्रसंग…तो मोबाईल नव्हता दादा, तो माझ्या मनातलं तुमच्यावर असलेलं प्रेम होतं. आजही लोक त्या घटनेमुळे मला ओळखतात, आणि त्यामागे तुमचंच नाव आहे. कालचं कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर मी तुम्हाला ९ तारखेचं आमंत्रण दिलं… आणि आज तुम्ही नाहीत… हे अजूनही खरं वाटत नाही. आमच्या नात्यात कधी कोणी आड आलं नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मला आपलंसं केलंत. तो विश्वास, ते प्रेम मी आयुष्यभर जपेन. दादा, तुमचं जाणं म्हणजे फक्त एका मोठ्या नेत्याचं नाही, तर माझ्या आयुष्यातील एका मार्गदर्शकाचं, एका आपुलकीच्या माणसाचं जाणं आहे. तुमच्या आठवणी, शिकवण आणि दिलेला विश्वास माझ्या प्रत्येक पावलात कायम सोबत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली दादा… तुमची उणीव शब्दांत मांडता येणार नाही. आपलाच,
प्रताप सरनाईक

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर