ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

8500 उमेदवारांनी दिली SRPF ची लेखी परीक्षा:4 परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा, पण बॅगा ठेवण्याची सोय नसल्याने परीक्षार्थींची धावपळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवारी सकाळी शहरातील चार केंद्रांवर शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी तब्बल 8 हजार 500 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्र परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. कडक तपासणी करूनच केंद्रात प्रवेश देण्यात आला. पण परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या बॅगा परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर ठेवाव्या लागल्या काही बॅगा झाडांवर अडकवलेल्याही दिसून आल्या. एमआयटी कॉलेज, श्रेयस कॉलेज, चाटे स्कूल आणि एंजल कीड स्कूल या चार केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमेदवारांना प्रवेश देण्यापूर्वी कडक तपासणी करण्यात आली. परीक्षेसाठी उमेदवार सकाळी लवकरच केंद्रावर दाखल झाले. केंद्रांबाहेर पालक आणि नातेवाईकांचीही मोठी उपस्थिती दिसून आली. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. परीक्षेच्या कामकाजासाठी एकूण एक हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस विभागाच्या नियमानुसार संपूर्ण परीक्षाप्रक्रिया सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पण उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्याची कोणतीही तजवीज नव्हती. अनेक उमेदवार बाहेर गावांवरून आले होते. त्यामुळे त्यांच्यापुढे आपल्यासोबतच्या बॅगा कुठे ठेवायच्या हा प्रश्न होता. अखेर त्यांनी परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या झाडांखाली व झाडांवरच अडकवून आपल्या बॅगा ठेवणे पसंत केले. याचे काही फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात परीक्षा केंद्रावर ठिकठिकाणी बॅगा पडलेल्या दिसून येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर