ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हवामानात बदल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेसोबतच पावसाचा हा दुहेरी परिणाम अनेकांना जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही झाली असल्याने शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणाऱ्या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूला ऊन आणि दुसऱ्या बाजूला पाऊस दरम्यान, काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने हवामानाची ही दुहेरी स्थिती नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. एका बाजूला कडक ऊन आणि दुसऱ्या बाजूला अचानक पाऊस व वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. पुढील काही दिवस हवामानाचा हा अनिश्चित पॅटर्न कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर