ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवार विमान अपघात प्रकरण:गरज पडल्यास जागतिक संस्थांची मदत घ्या, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात आम्हीच सीबीआय चौकशीची मागणी केली- तटकरे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांच्या अपघाताबाबत जनसामान्यांच्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. गरज पडल्यास या तपासासाठी जागतिक स्तरावरील निष्णात संस्थांची मदत घ्यावी, पण सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, विमान अपघाताचा तपास करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये. आजवर या प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, त्या सर्व बाबींचा सखोल तपास व्हावा. भारत सरकारच्या स्वायत्त संस्था आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत चौकशी सुरू आहेच, शिवाय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सीआयडी (CID) चौकशीचे आदेश दिले आहेत. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली सीबीआय चौकशीची मागणी तपासाच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ मागणी करून थांबलो नाही, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनीही तत्परता दाखवत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ही मागणी वर्ग केली असून, त्यानुसार आता सीबीआय तपास सुरू झाला आहे. 1991 पासूनचे ऋणानुबंध अन् राजकीय प्रवास अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना तटकरे भावूक झाले. त्यांनी सांगितले की, अजितदादा आणि माझा परिचय 1991 पासूनचा आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी आमच्यात झालेली दोन तासांची चर्चा आजही स्मरणात आहे. त्यांनी मला राजकारणात अनेक संधी दिल्या. माझी लोकसभा लढण्याची इच्छा नसतानाही केवळ त्यांच्या शब्दखातर मी निवडणूक लढलो. मात्र, यश मिळाल्यानंतर दादांचा असा अपघाती मृत्यू होणे हे धक्कादायक आहे. टीकाकारांना सुनावले अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यावरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. अजितदादांचा एकनिष्ठ सहकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना संधी मिळावी, ही आमची ठाम भूमिका होती. ज्यांना टीका करायची आहे त्यांनी ती खुशाल करावी, पण आम्ही आमचे प्रामाणिक कर्तव्य पार पाडले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. तटकरेंची पोस्ट काय? अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. या निमित्ताने सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर