ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचा इशारा:धूलिवंदनाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धूलिवंदनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस दलाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागातून बेकायदेशीर रित्या गावठी दारू गाळप व विक्री होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणे अंतर्गत विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेची चार पथकेही कार्यरत असणार आहेत. या पथकाच्या माध्यमातून चार चाकी, दुचाकी वाहनांसह ऑटोची तपासणी केली जाणार असून दारूची वाहतूक करणारी वाहने जप्त करून चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी रविवार ता एक पासून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी केली जाईल. शहरासह जिल्ह्यात मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या संदर्भातील स्पष्ट आदेश जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. संवेदनशील भागामध्ये पोलिस विभागाची गस्त राहणार आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली आहे. तर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वाहन चालकांची ब्रिथ ऍनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागांमधून होणाऱ्या पार्ट्यांवरही लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही होळी व धुलीवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा करावा तसेच धुलीवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर