ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राज्यात झुंडशाही सुरु, लोकशाही संपली:दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचे निलंबन करा; उद्धव ठाकरेंची मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच झुंडशाही सुरु झाली आहे, लोकशाही आत्ता संपली आहे. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळावापळवी सुरु केली आहे, निवडणुका बिनविरोध होत आहेत. राहुल नार्वेकर धमक्या देत आहेत, हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी ठाकरेंनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात, ते आमदारासारखे वागू शकत नाही. दमदाटी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत, त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे, जिथे बिनविरोध निवडणूक झाल्या, तिथे पुन्हा निवडणूक घेतल्या पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो आणि तो कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी किंवा समर्थनासाठी जाऊ शकत नाहीत. परंतु, त्यांनी संरक्षण काढून घेण्याचे आदेश जे काही दिले, हा त्यांना अधिकार बाहेर नसतो, विधानसभेत असू शकतो. पालिकेच्या ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात- उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या निधीतून आपण कोस्टल रोड तयार केला आहे आणि तोही टोल मुक्त. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती, असे म्हणावे लागेल, ज्यात आपण 92 हजार कोटीपर्यंत ठेवी ठेवल्या होत्या. यातूनच आपण विकासकामे केली आहेत. नितीन गडकारींचा मुंबई-गोवा महामार्ग अजूनही तयारच होत आहे. ठेवी या काही चाटायला नसतात, पण याच ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. साधारण 3 लाख कोटींचा घोटाळा महायुतीने केला आहे. ही माझ्याकडे माहिती आली असल्याचे ठाकरेंनी म्हटले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर