ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं?

14 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत खेळता खेळता एका 11 महिन्याच्या बालिकेने क्रिम ट्यूबचे टोपण गिळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांची धाकधुक वाढली होती. त्यानंतर त्याने लगेच बाळाला महापालिकेच्या रुग्णालयात नेले पण तेथे तिच्यावर उपचार होऊ शकले नाही. शेवटी त्यांनी चंद्रपुरातील ई एन टी तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांच्याकडे तिला नेले आणि दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश आले आणि कुटुंबियांच्या जीवात जीव आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील साखरा गावात ही घटना घडली आहे.साखरा गावात सरोदे कुटुंबिय राहते. आज दुपारी 11 महिन्याची अधिरा घरात खेळत असताना तिने खेळता खेळता क्रीम ट्यूबचे टोपण गिळले. या घटनेची माहिती मिळताच आईसह कुटुंबियांना धक्का बसला होता.त्यानंतर त्यांनी तत्काळ धावाधाव करत रुग्णालयात नेले पण नंतर त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यास सांगितले.

शेवटी त्यांना चंद्रपुरात ई एन टी तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांच्याकडे रेफर करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ उपचाराला सुरुवात केली.यावेळी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी अधिराच्या तोंडातून टोपण काढत तिचे प्राण वाचवले आहे.त्यामुळे कुटुंबियांच्या जीवात जीव आला होता.

दोन तासांपूर्वी मुलीने खेळता खेळता प्लास्टीकच झाकण गिळलं.खुप मोठं हे झाकण आहे.हे झाकण श्वास नलीका आणि अन्न नलीकेच्या मध्येच ते फसलं होतं. पण तीच नशीब बलवत्तर होतं की तिचा श्वास सुरु होता.तिच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखवलं पण त्यांना शेवटी चंद्रपुर येथे रेफर करण्यात आलं.त्यानंतर ती आमच्याकडे येताच आम्ही दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ते झाकण बाहेर काढण्यात यश आले, डॉ. मनीष मुंदडा, ENT तज्ञ यांनी सांगितले.

लहान मुलांना सहज तोंडात घालता येतील अशा कुठल्याही वस्तू त्यांच्या आसपास ठेवू नका असे आवाहन या प्रकारानंतर तज्ञांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर