ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

इंधनावरील कर कपात ही शुद्ध धूळफेक:कपातीचा लाभ केवळ कंपन्यांना, जनतेला काडीचाही फायदा नाही, काँग्रेसचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात ही शुद्ध धूळफेक असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली 10 रुपयांची कपात शुद्ध धूळफेक आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही, असे ते म्हणालेत. मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर तत्काळ लागू झालेत. सरकारी तेल कंपन्या पेट्रोलवर 24 रुपये व डिझेलवर 30 रुपये प्रति लिटर तोटा सहन करत आहेत. त्यामुळे त्या इंधन दरवाढीचा विचार करत होत्या. पण सरकारने ऐनवेळी कर कपात करून या कंपन्यांना दिलासा दिला आहे. पण विरोधकांनी सरकारच्या या कर कपातीचा देशातील सर्वसामान्य जनतेला काडीचाही फायदा होणार नसल्याचा दावा केला आहे. सरकारने निवडणुकीमुळे रचला खेळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची करकपात ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात म्हणजे शुद्ध धूळफेक आहे. ही कर कपात नागरिकांसाठी नव्हे, तर इंधनाचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी करण्यात आली आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही. 4 राज्यांमध्ये होऊ घातलेला विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने हा खेळ रचला आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत 60-70 डॉलर प्रतिबॅरल असताना, काँग्रेसच्या पुण्याईने इराण व रशियाकडून सर्वांत स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असताना केंद्र सरकारने कर कमी केला असता. पण सरकारने स्वस्त इंधनाचा फायदा जनतेला न देता प्रचंड कर लावून जनतेची लूट सुरू ठेवली. मोदीजींच्या कृपेने त्यांच्या उद्योगपती मित्रांची नफेखोरी सुरू राहिली. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे मोदीजींच्या उद्योगपती मित्रांना तोटा होत आहे, म्हणूनच या मित्रांच्या कंपन्यांवरील करात कपात करण्यात आली आहे, असे ते म्हणालेत. राज्यांवर व्हॅट कमी करण्याचा दबाव केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारांवरील आपला व्हॅट कमी करण्याचा दबाव वाढला आहे. राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली, तरच पेट्रोल पंपांवर ग्राहकांना 2 ते 5 रुपयांची थेट सवलत मिळू शकणार आहे. हे ही वाचा… सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 10-10 रुपये घटवली:क्रूड महागल्याने कंपन्या दर वाढवू शकत होत्या, हे रोखण्यासाठी घेतला निर्णय सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. पेट्रोलवरील शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये करण्यात आले आहे, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्य करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. अमेरिका-इस्रायलसोबत इराणच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 73 डॉलरवरून वाढून 105 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. यामुळे तेल कंपन्यांना तोटा होत होता. तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्या दर वाढवू शकल्या असत्या. उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. कपातीचा परिणाम 7 प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर