ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मालमत्तेवरून वाद:कोर्टाच्या निकालानंतर वडिलांनी घराचा ताबा घेतला अन् मुलाने रस्त्यातच त्यांना संपवले, संभाजीनगरमध्ये रात्री घडलेला थरार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


घराच्या मालकीचा निकाल वडिलांच्या बाजूने लागला. त्यानुसार गुरुवारी (११ जून) तहसीलदार व सातारा पोलिसांच्या समक्ष ताबा दिला. तेथून परत येत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मुलाने रिक्षा अडवून वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (८२, रा. सध्या पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची मुलगी जखमी झाली. आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल जाफर (४५, रा. सिल्कमिल कॉलनी) यास ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. रात्री नऊच्या सुमारास सिल्कमिल्क कॉलनीत हा थरारक प्रकार घडला. जाफर पटेल आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नुकताच निकाल वडिलांच्या बाजूने लागला होता. या निकालानुसार, वादग्रस्त घराचा ताबा घेण्यासाठी पुणे येथून जाफर पटेल आणि त्यांची मुलगी शहरात आले होते. रात्री साठेआठच्या सुमारास घराची पाहणी करून पटेल घरी परतत असताना त्यांच्यावर व मुलीवर आरोपीने जीवघेणा हल्ला केला. वडिलांवर ८, बहिणीवर ५ वार आरोपीने चाकूने वडिलांच्या गळ्यावर, पोटावर, छातीत आणि हातावर तब्बल ८ वार केले. तर, जखमी बहिणीच्या तोंडावर आणि गळ्यावर ५ वार केले. तिच्यावर घाटीत उपचार सुरू असून तिला १५ ते २० टाके पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुलूप बघायला गेले अन् घात झाला पटेल यांना घराचा ताबा मिळत असताना आरोपीने तेथे गोंधळ घातला. ताबा घेतल्यानंतर सर्व जण परत निघाले. त्या वेळी मुलाने कुलूप तोडले असेल, असे म्हणत वडील पुन्हा तपासणीसाठी गेले. कुलूप व्यवस्थित असल्याची खात्री करून परतताना आरोपीने त्यांना गाठले व चाकूने वार करून वडिलांना ठार केले. आरोपी मेहुण्याच्या घरी लपला आरोपी रहेमान पळून गेल्याची माहिती मिळताच छावणी ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव, सातारा ठाण्याचे नंदकुमार भंडारे आदींच्या पथकाने रात्री त्यास मिटमिटा येथील मेहुण्याच्या घरातून ताब्यात घेतले. झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने तो नशेत असल्याचा संशय आहे. त्याला तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेले आहे. त्रासामुळे कंटाळून मुलीकडे वास्तव्य अबरार कॉलनी येथे पटेल यांच्या कुटुंबातील दोन्ही मुले व वडील एकत्र राहत होते. ते जलसंपदा विभागातून निवृत्त झाले होते. आरोपी मुलगा सातत्याने घरातील सदस्यांशी वाद घालायचा. त्याच्यावर पहिल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला. मात्र तोही संसार व्यवस्थित सुरू होता. काही वेळा त्याने वडिलांना मारहाणही केली. त्यामुळे बहिणीने वडिलांना आपल्याकडे पुण्याला राहण्यासाठी नेले होते. त्यानंतर शिक्षित वडिलांनी कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबला. २ वर्षांनी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार गुरुवारी घर त्यांच्या ताब्यात आले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर