ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पावसाच्या दांडीमुळे यंदा पेरण्या खोळंबल्या:नजरा आभाळाकडे, कृषीतज्ज्ञांनी धीर घरण्याचे केले आवाहन‎

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकरी अजुनही मान्सुनच्या मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुन महिन्याची २० तारीख उलटली तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेला बळीराजा चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आताच पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने मेळघाटातील अनेक गावांमध्ये पेरणीची कामे थांबलेली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, बियाण्यांची खरेदी, खतांची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करत नाहीत. मेळघाटातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. डोंगराळ भाग, दुर्गम गावे आणि मर्यादित सिंचन सुविधा यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी पावसाचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. पहिल्या दमदार पावसाच्या सरी कोसळल्या की शेतकरी आनंदाने शेताकडे धाव घेतात. मात्र,यंदा आकाशात ढग दिसत असले तरी पाऊस मात्र समाधानकारक झालेला नाही. शेत तयार आहे, बियाणे तयार आहे, फक्त पावसाची साथ हवी आहे, अशी भावना मेळघाटातील बळीराजा व्यक्त करत आहे. आता मेळघाटातील शेतकऱ्यांच्या आशा आभाळाकडे लागल्या असून, हिरवाईने नटलेल्या शेतांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पेरणी पुढे ढकलली तर उत्पादनावर परिणाम पाऊस लांबल्यास पेरणीचा कालावधी पुढे ढकलला जाण्याची आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जिल्ह्यासह मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा आहे. शेतात उभे राहणारे पीक, घरातील आनंद आणि आर्थिक आधार हा सगळा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी मनोमन प्रार्थना करत आहे की, लवकरच वरुणराजाने कृपा करावी आणि कोरड्या पडलेल्या जमिनीवर पावसाच्या सरी बरसाव्यात.कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आताच पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. जून महिना अर्ध्यावर आला असतानाही चांदूर रेल्वे तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाची सुरुवात होत असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. मात्र, यंदा आभाळात ढगांची वर्दळ दिसत असली तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतीचे संपूर्ण गणितच बिघडले आहे. चांदुर तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीसाठी आवश्यक खर्चही केला आहे. मात्र पाऊस नसल्याने पेरणी सुरू करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेरणीसाठी योग्य कालावधी हातातून निघून जात असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर