ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अशोक खरातच्या जीवाला धोका, फाईल बंद करण्यासाठी काहीही होऊ शकतं:त्याला जेलमध्ये सुरक्षा द्या, अंजली दमानियांची मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण मिटवण्यासाठी जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे यात काहीच शंका नाही. खरातला इतक्या गोष्टी माहिती असाव्या की ते बाहेर येऊ नये म्हणून खरातचे काही बरे वाईट केले जाईल ही भीती त्याच्यासह आम्हा सर्वांना आहे. प्रकरण दाबायचे असेल तर त्याच्या जीवाचे काही बरे वाईट करत फाईल बंद करण्यात येईल. हे होऊ नये म्हणून त्याला सुरक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.राज्यात रोज नव्या भोंदू बाबांचे प्रकरणे समोर येत आहेत, आपण काय करतो आहोत, असा प्रश्न पडला आहे. खरातप्रकरणी बीडच्या व्यक्तीची SIT कडे तक्रार राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलिस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खरातचे वक्तव्य काय नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज तासन्‌तास चालणाऱ्या चौकशीमुळे त्याच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर चौकशीदरम्यान त्याने, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, असे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक खरातला अटक झाल्यापासून त्याच्याविरोधात एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. एका प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोच दुसऱ्या प्रकरणात त्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या एसआयटीकडून त्याची दररोज आठ ते दहा तास चौकशी होत असून, या प्रक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती ढासळल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात सुमारे 15 गुन्हे नोंदवण्यात आले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासावर भर दिला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर