ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मंत्री झिरवाळ VIDEO प्रकरणात नवा ट्विस्ट:आरोपीची FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव; ट्रान्सजेंडर भावावरच केले गंभीर आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे अन्न व व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी आरोपी असणाऱ्या तरुणाने हायकोर्टात धाव घेऊन झिरवाळ यांच्यासोबत व्हिडिओत दिसणाऱ्या आपल्या ट्रान्सजेंडर भावावरच खंडणी, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परिणामी, या सर्व प्रकरणाला एक वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात नरहरी झिरवाळ पवन यादव नामक एका ट्रान्सजेंडर तरुणासोबत कथितपणे आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले होते. हा व्हिडिओ ट्रान्सजेडर व्यक्तीच्या भावानेच व्हायरल केला होता. त्यानंतर ट्रान्सजेंडरने पोलिसांत धाव घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण आता आरोपी भावानेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, आपल्याला या खोट्या गुन्ह्यात जाणिवपूर्वक अडकवण्यात आले. प्रस्तुत प्रकरणातील माझ्यावरील आरोप पूर्णतः खोटे आहेत. संबंधित ट्रान्सजेंडर व्यक्तीवरच खंडणी, ब्लॅकमेलिंग, गुन्हेगारी धमकी व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणी माझ्याविरोधात कफ परेड पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर कायदेशीररित्या चुकीचा आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्याने कोर्टाकडे केली आहे. त्याच्या या मागणीमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. झिरवाळ यांच्या कथित व्हिडीओत नेमके काय? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ट्रान्सजेंडर पवन यादव हा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत दिसून येत आहे. हा व्हिडिओ शासकीय निवासस्थानातील आहे. त्यात पवन व मंत्री झिरवाळ बिछान्यावर असून, त्यांच्या शेजारी खाद्य व मद्य हे दोन्ही दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. त्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली. त्यानंतर काही दिवसांनी ट्रान्सजेंडर पवन यादव याने आपल्या भावाविरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणाने नव्या अंगाने पाहिले जाऊ लागले. पण आता आरोपी भावानेच ट्रान्सजेंडरवर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यावरूनही बराच वाद झाला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर