ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मालाडचा भोंदूबाबा रिदम पांचाळ गजाआड:पालिकेच्या उद्यानात मांडला होता ‘भूत’ उतरवण्याचा खेळ, दोन आठवड्यांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ असे या भोंदूबाबाचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून मालाड परिसरात ‘भूत उतरवण्याच्या’ नावाखाली त्याचे अघोरी प्रकार सुरू होते. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रिदम पांचाळ हा गेल्या दोन वर्षांपासून मालाडमध्ये दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे आयोजन करायचा. माझ्या अंगात देवी येते असा दावा करून तो रात्री 6 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत विधी करायचा. सुरुवातीला हे प्रकार त्याच्या घरापुरते मर्यादित होते, मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क मनपाच्या उद्यानात शेकडो लोकांच्या उपस्थितीत उघडपणे जादूटोण्याचा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात होता. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, मालाड परिसरातील रहिवासी असलेला रिदम पांचाळ गेल्या दोन वर्षांपासून दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे आयोजन करत असे. “माझ्या अंगात देवी संचारते” असा दावा करून तो रात्री 6-7 वाजेपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विधी करायचा. सुरुवातीला हे प्रकार घरापुरते मर्यादित होते, मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानात शेकडो लोकांना जमवून उघडपणे जादूटोण्याचे प्रयोग केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. अघोरी साहित्यामुळे दहशतीचे वातावरण हा भोंदूबाबा उपचारांच्या नावाखाली भक्तांकडून अत्यंत संशयास्पद आणि अघोरी साहित्याची मागणी करायचा. यामध्ये बकऱ्याचे काळीज (कलेजा), स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली आणि सिगारेट यासारख्या गोष्टींचा समावेश होता. हे साहित्य विधीनंतर चार रस्यांच्या मध्यभागी (चौकात) नेऊन ठेवण्यास तो सांगत असे. या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रहिवाशांच्या जागरूकतेमुळे कारवाई वारंवार सांगूनही रिदमने आपले प्रकार थांबवले नाहीत. अखेर दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत त्याच्या अघोरी कृत्यांचे व्हिडिओ पोलिसांना दिले आणि सामूहिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली होती. प्राथमिक चौकशीनंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपी रिदम पांचाळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर