ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मारेगाव तालुक्यातील घटना; ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, युवकाने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अनिकेत पद्माकर धाबेकर (वय ३१) असे मृत युवकाचे नाव आहे. तो शिवनी धोबे, पोस्ट हिवरा (मजरा), ता. मारेगाव येथील रहिवासी होता. अनिकेतच्या नावावर सुमारे तीन एकर शेती असल्याची माहिती असून, तो शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.


रविवारी रात्रीच्या सुमारास अनिकेतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अनिकेतच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील तरुण कर्त्या व्यक्तीच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिवनी धोबे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनिकेतने गळफास घेऊन आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून, तपासाअंती आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र तुमराम पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर