ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी दिल्ली: निवडणूक प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) दरम्यान नाव न सापडल्याने किंवा मतदारयादीतील त्रुटींमुळे ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांना आता निवडणूक कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. बूथ लेव्हल अधिकारी (BLO) स्वतः अशा मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करतील आणि ती निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यानंतर, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) या अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढील निर्णय घेतील. दरम्यान, ‘SIR’चा निर्णय सर्वसंमतीनेच घेण्यात आला असल्याचेही आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अत्यंत विशेष प्रकरणातच सुनावणी,  कुटुंबातील सदस्य राहू शकतो हजर…
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अतिशय विशेष किंवा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येच मतदाराला ERO किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाईल. ही सुनावणीसुद्धा शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, एखाद्या मतदाराला प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य असल्यास, तो स्वतःऐवजी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला सुनावणीसाठी पाठवू शकतो.
महाराष्ट्र आणि दिल्लीतील मतदारांसाठी मुदतवाढ
महाराष्ट्रातील मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे. ‘SIR’ संदर्भात दावे आणि आक्षेप दाखल करण्याची मुदत वाढवून १२ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे, तर या दाव्यांच्या निपटारा करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांचे नाव ‘SIR’ प्रक्रियेत आलेले नाही किंवा जे नवीन मतदार आहेत, त्यांचा मतदारयादीत समावेश करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश राज्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, दिल्लीतील मतदारांसाठीही दावे व आक्षेप दाखल करण्यासाठी ३० ऑक्टोबर आणि निपटारा करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर