ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अनाथालयाला भेट:संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज जाणून घेतले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | टाकळी जिवरग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निल्लोड फाटा येथील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय तथा संत ज्ञानेश्वर विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज त्यांनी जाणून घेतले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून अनाथ, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे काम संस्था करत आहे. या उपक्रमाबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज पवार यांनी सामंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सामंत यांनी आश्रमातील वारकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संस्थेमार्फत सुरू असलेले वारकरी परंपरेतील संस्कारयुक्त शिक्षण, अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे काम पवित्र आहे. समाजासाठी प्रेरणादायी आहे. शासनस्तरावरून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. या वेळी शनेश्वर प्रतिष्ठान, सिल्लोडचे १००८ महामंडलेश्वर शनिउपासक मंगरूळकर शास्त्री महाराज, श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था, केऱ्हाळा येथील अध्यक्ष देवदास महाराज मिसाळ, शिवसेना नेते नंदूभाऊ सहारे, वारकरी, विद्यार्थी, शालेय कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर