ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भाजपला कुबड्या नकोत, महाजनांच्या वक्तव्याने शिवसेना संतप्त:एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय; वातावरण तापले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणावाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. या मुद्द्यावर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. एका वाक्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण अचानक तापल्याचे चित्र आहे. नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या पदांवर वाटाघाटी होऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या प्रस्तावानंतर काही दिवसांतच मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य करत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या वक्तव्याने शिवसेनेत संतापाची लाट उसळली. भाजपकडून आलेल्या प्रस्तावानंतर आता अशी भूमिका घेणे अनाकलनीय असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे, अशी टीकाही करण्यात आली. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी या संबधीची नाराजी उघडपणे व्यक्त केली. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आमच्या पक्ष कार्यालयात आले होते. त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. आणि आता त्यांचे वरिष्ठ नेते ‘कुबड्या नको’ असे म्हणत आहेत. हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, असे बोरस्ते म्हणाले. या घडामोडींमुळे मित्रपक्षांमधील विश्वासावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे त्यांनी सूचित केले. बोरस्ते यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शिंदे साहेब जो निर्णय देतील, तो आम्ही मान्य करू. त्यांनी विरोधी बाकावर बसण्यास सांगितले, तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव उघड शिवसेनेने उपमहापौर, स्थायी समिती आणि अन्य महत्त्वाच्या पदांबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. महायुती सत्तेत आल्यास आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांना सोयीचे ठरले असते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण चित्र बदलल्याचे ते म्हणाले. आता परिस्थितीचा सविस्तर आढावा शिंदे यांना दिला जाणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे नाशिकमधील महापालिकेचे राजकारण तापले आहे. एका वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव उघड झाला आहे. पुढील काळात हा वाद कोणत्या दिशेने वळतो, आणि महापौर निवडणुकीच्या समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर