ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बंजारा समाजाचा ST मध्ये समावेश होणार का?:हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात 6 सदस्यीय समिती स्थापन; आंदोलनाला फळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य सरकारने बंजारा समाचा एसटी अर्थात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मुद्यावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक 6 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे कथिपणे नाराज झालेल्या बंजारा समाजाला एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदडे, बुलढाणा, जळगाव आदी जिल्ह्यांत बंजारा समाजाने मोठे मोर्चे काढले होते. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर या समाजाचा एसटीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती. तसेच या प्रकरणी कोर्टात जाण्याचाही इशारा दिला होता. त्यावर सरकारने या प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक 6 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. काय नमूद आहे शासन निर्णयात? सरकारच्या परिपत्रकानुसार, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती व सदर बैठकीचे इतिवृत्त दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजीच्या संदर्भाधीन पत्रान्वये इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बंजारा प्रवर्गातील उप वर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बंजारा प्रवर्गातील उप वर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करम्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सादर करम्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत आहे. कोण कोण आहे समितीत?

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर