ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी, शेतमजुरांची धडक मोहीम:तिवसा येथे तीव्र आंदोलन, म्हणाले – अदानीच्या लाभासाठी चाललेली लूट थांबवा : शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हे नवीन स्मार्ट मीटर बसवताच वीजबिलात थेट १०० ते २०० टक्क्यांची वाढ होत आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे कोलमडला आहे. वीज ही मानवी जीवनाची मूलभूत गरज असताना वीज कंपन्या व सरकार युनिट दर १५ पैशांवरून थेट १५ रुपयांपर्यंत वाढवत आहेत. ग्राहकांची ऊसासारखी पिळवणूक होत असल्याची संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या जाचक धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा. शंका असेल तर आहे त्याच मीटरची तांत्रिक तपासणी करा. पंजाब व तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर स्मार्ट मीटर न बसवण्याचा अधिकृत निर्णय घ्या. वीज दरवाढ मागे घ्या. २४ तास वीज पुरवठा करा. कृषी पंपांसाठी सोलरची सक्ती मागे घ्या. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवा. निवडणुकीत एन.डी.ए.ने घोषणा केल्याप्रमाणे २०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा. या मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात किसान सभा व शेतमजूर युनियनचे प्रकाश सोनोने, चंद्रकांत वडस्कर, राजाभाऊ बाभुळकर, मनोहर वाढोणकर, जितेंद्र कोरडे, सलीम खॉ, देवेंद्र बावणे, अंबादास जुवारे, दिलीप गोहत्रे, संजय गोरडे, सुरेश राउत, श्रीकृष्ण लांजेवार, निरंजन बेले, विलास हांडे, सुरेश ढोरे, राहुल ढोरे, सचिन बारवाल, अशोक भेलकर, प्रवीण घुरडे, नथ्युजी फरकाळे, दिलीपसिंह नाहटा, तस्लीमा बेग, अरून सुने, अनिकेत खुळे, दिनेश लिलव्हे, सय्यद आशिक, सयरा परविन, गुलखॉ, सरफोदीन काजी, शेख आरीफ तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव सागर भवते, प्रशांत काबळे, मनिष खरे, मिलींद यावले यांच्यासह अनेक वीज ग्राहक सहभागी झाले होते.जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर