बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Premanand Maharaj Shishya Death Case : क्रिकेटर विराट कोहलीपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी ज्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात अशा मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांच्या एका शिष्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. रसिक दुलारी असं या 25 वर्षाच्या शिष्याचं नाव असून गुरुवारी सकाळी त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. रसिक दुलारी शरण गुरुवारी सकाळी चौथ्या मजल्यावर गेला, तिथे थोडा वेळ बसला आणि नंतर त्याने उडी मारली.
गुप्तांग कापल्याचा संशय, सीसीटीव्ही फुटेज सापडलं
रसिक दुलारी याला गंभीर अवस्थेत सर्वोदय रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. खोलीत रक्ताने माखलेले एक ग्राइंडर सापडलं. तसेच प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, तिच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते. त्याचं गुप्तांग कापल्याचा संशय आहे. रसिक दुलारी शरण इमारतीवरून उडी मारत असल्याचे दाखवणारे एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला आहे.
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल! रुपाली चाकणकरांचं नाव घेत गंभीर आरोप
रसिकला भेटू दिलं जात नव्हतं?
पोलीस अधिक्षक राजीव कुमार यांनी या घटनेची माहिती सांगितली, घटनेनंतर मयत शिष्याचं कुटुंब मथुरेत आले आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांना रसिकला भेटू दिलं जात नव्हतं, असा त्यांचा आरोप आहे. तथापि, त्यांच्या आरोपांची चौकशी केली जात आहे, असं पोलीस अधिक्षक राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. रसिकच्या कुटूंबियांनी केलेला आरोप गंभीर मानला जात आहे. ‘दैनिक भास्कर’ने याबाबत वृत्त दिलंय.
खोलीत काही संशयास्पद वस्तू
रसिक दोन वर्षापूर्वी वृंदावन आला होता. त्याने प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतली होती. रसिक दुलारीला विजेचे काम येत होते, त्यामुळे तिला आश्रमात या सेवेसाठी नेमण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी, रसिक दुलारीला गुरु कृपा कुंजच्या चौथ्या मजल्यावर राहण्यासाठी एक खोली देण्यात आली होती. या घटनेत, फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. खोलीत काही संशयास्पद वस्तू आढळल्या असून, त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना इतक्या उशिरा का कळवण्यात आलं?
रसिक दुलारीला जेव्हा रुग्णालयात आणलं तेव्हा तिचा आधीच मृत्यू झाला होता. मग पोलिसांना इतक्या उशिरा का कळवण्यात आलं? असा सवाल सर्वोदय रुग्णालयाने उपस्थित केला आहे. त्याच्या गुप्तांगांवर जखमांच्या खुणा होत्या. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की, त्याने आपले गुप्तांग कापून टाकण्याचा प्रयत्न केला होता का? असा सवाल देखील विचारला जात आहे.