ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला:पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी; व्हीसीद्वारे सुनावणी, कोर्टात काय घडले?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) ‘एसआयटी’ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलिसही चक्रावून गेले आहेत. यातील ८ गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित ७ गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलिस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरातच्या १०० कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे. कोर्टात काय घडले? अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. आजची ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. “आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे,” असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी ही मागणी खोडून काढताना सांगितले की, पोलिस तेच जुने मुद्दे मांडून पुन्हा पुन्हा कोठडी मागत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खरातचे डोके दुखायचे थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही दरम्यान, अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टाकडे एक मागणी केली आहे. अशोक खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. त्याच्या वेदनांवर पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप ११ गुन्ह्यांची चौकशी बाकी आतापर्यंत अशोक खरातच्या केवळ ४ गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित ११ गुन्ह्यांमध्ये अद्याप त्याची सखोल चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पाचव्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला आता पोलिस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. एसआयटीने खरातच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे. तपासातील ७ धक्कादायक आणि थरारक बाबी : रिमोट कंट्रोलचा साप: भक्तांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खरात २० फुटांचा एक बनावट नाग ‘रिमोट कंट्रोल’ने फिरवत असे. या ‘चमत्कारा’ला नागरिक दैवी शक्ती मानून घाबरत होते. बनावट चमत्कार: दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसारख्या वस्तूंचा वापर करून तो चमत्काराचा बनाव करायचा. बड्या हस्तींशी ‘कनेक्शन’: तपासादरम्यान खरातचे अनेक बडे नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी असलेले जवळचे संबंध उघड झाले आहेत. त्या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ५०० कोटींची मालमत्ता: खरातची संपत्ती ५०० कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ‘ईडी’ आता त्याच्या मालमत्तेची चौकशी करत आहे. पत्नी अद्याप फरार: खरातची पत्नी कल्पना ही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी तिचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुंगीच्या द्रव्याचा वापर: पीडित महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा गुंगी येण्यासाठी तो विशिष्ट औषधांचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ब्लॅकमेलिंगचे रॅकेट: फसवणूक आणि अत्याचारासोबतच खंडणी उकळण्याचे मोठे रॅकेट तो चालवत होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर