ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

धक्कादायक! नरसाळा येथील गिट्टी खदानीत वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरक्षेअभावी नागरिकांमध्ये संताप

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 65 वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत महिला सौ. बेबीबाई तुळशिराम राजगडकर (वय 65, रा. नरसाळा) या रविवारी दि. 19 एप्रिल 2026 रोज सकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास घरातील कपडे धुण्यासाठी गावातील सरकारी गिट्टी खदान परिसरातील पाण्याच्या खड्यात गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.

दरम्यान, गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शोध घेत असताना त्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या. तात्काळ त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. असुन कलम 194 बीएनएसएस अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पती,दोन मुलं, सुना नातवंड आप्तपरिवार आहे.

दरम्यान, गावातील सरकारी खदान परिसरात सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर