ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

Kolhapur: पती कामावर गेलेला, पत्नी दिराच्या घरी गेली अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं!

12 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: किरकोळ वादातून दिरानेच वहिणीचा डोक्यात हातोडा घालून खून केला. सरनोबतवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या भयंकर घटनेनं कोल्हापूर हादरलं. रुक्मिणी धर्मेंद्र साहनी असे मृत 24 वर्षीय महिलेचे नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील संत कबीरनगरची आहे. याप्रकरणी संशयित दीर श्रीमंधर बसंत साहनी फरार असून त्याच्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं घडलं काय?

मूळचे उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर येथील साहनी कुटुंब हे उचगाव परिसरात वास्तव्यास आहे. धर्मेंद्रकुमार साहणी हा फरशी फिटिंगचे काम करतो. तर त्याचा भाऊ श्रीमंधर साहनी हा सरनोबतवाडी येथेच अमर महिपती माने यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो. सोमवारी सायंकाळी धर्मेंद्रकुमार हा कणेरी मठ परिसरात कामानिमित्त गेला होता. तेव्हा त्यांची पत्नी रुक्मिणी ही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने दीर श्रीमंधर यांच्या घरी गेली होती.

लग्न झालं, 8 महिन्यात नवरा गेला, सासू अन् दीराचं विधवा सुनेसोबत धक्कादायक कृत्य, कोल्हापुरला हादरवणारी घटना

दीर-भावजयीत किरकोळ वाद आणि…

रुक्मिणी ही दीर श्रीमंधर याच्या घरी गेली असता दोघांत काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात श्रीमंधर याने घराच्या दारातच रुक्मिणी हिच्या डोक्यात हातोड्याने वार केले. यात गंभीर जखमी होऊन रुक्मिणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. या घटनेनंतर श्रीमंधर याने तिथून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पती धर्मेंद्रकुमार याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पत्नीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेची नोंद गांधीनगर पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर