ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा मार्ग परिसरातील नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अकोट-अकोला मार्गावरील पळसोद फाटा, गांधीग्राम, करोडी फाटा, देवरी फाटा, बळेगाव आणि तांदूळवाडी या सर्वच ठिकाणी काँक्रीट मार्ग दबला असून त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पळसोद फाटा येथे तर गेल्या महिनाभरात दोन भीषण अपघात होऊन दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण कायमचे दिव्यांग झाले आहेत. सार्वजनिक पैशातून होणाऱ्या या विकासकामांच्या गुणवत्तेचे तातडीने ऑडिट करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुरुस्ती करा, अन्यथा रस्त्यावर उतरू देवरी फाटा आणि पळसोद फाटा येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे दोन बळी गेले आहेत. संबंधित विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा रस्त्यांची लढाई रस्त्यावर उतरून लढली जाईल,अशा शब्दात डॉ. योगेश गायकवाड यांनी इशारा दिला आहे. रास्ता रोको आंदोलन करणार अकोट-अकोला मार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाही लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग ढिम्म आहेत. ही गंभीर समस्या त्वरित न सोडवल्यास देवरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,अशी प्रतिक्रीया व्यावसायिक मयुर वाघोडे यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर