ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

विकास मंचची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी:तहसीलदार शिल्पा बोबडे यांचे माना येथे आयोजित समाधान शिबिरात प्रतिपादन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोला तालुक्यातील ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या दहीहांडा येथील पाणी पुरवठा योजेनसह अन्य कामांची चौकशी करण्याची मागणी दहीहांडा विकास मंचाने केली आहे. मंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत ही मागणी केली.निकृष्ट विकासकामे, विकासनिधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप दहीहांडा विकास मंचाने केला आहे. निवेदनात दलित वस्त्यांमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांच्या दर्जावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रस्ते, नाल्या, पेव्हर ब्लॉक आणि इतर विकासकामांमध्ये निकृष्ट साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सर्व विकासकामांचे तांत्रिक लेखापरीक्षण आणि सामाजिक लेखापरीक्षण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी दहीहांडा विकास मंचाचे प्रा. डॉ. विजय आठवले, दीपक भांडे,किशोर सिरसाट, शोभीत आठवले, गोविंद झाडे, अजय आठवले, राहुल आठवले, संजय खाडे, शत्रुघ्न आठवले, निलेश जैन, राजू लाड, भास्कर खेतखडे, नागेश आठवले, सागर आठवले, विपिन आठवले, इस्माईल शेख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना मंचचे पदाधिकारी. पाणीपुरवठा योजनेसाठी १४ लाख रुपये केले मंजूर दहीहांडा गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पाणीटंचाई निधीतून तब्बल १४ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र या निधीचा योग्य वापर करण्यात आला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्णा नदीवरून गावात पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली नवीन पाइपलाइन टाकण्याऐवजी जुन्याच पाइपलाइनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मोटार, बोरवेल, पाइपलाइन व इतर साहित्यांवर अंदाजपत्रकानुसार खर्च न करता केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनासमोर मागण्या मांडल्या १) विशेष पाणीपुरवठा योजनेची उच्चस्तरीय चौकशी. २) अवैध नळजोडणी बंद करण्यात यावी. ३) दलित वस्त्यांतील निकृष्ट विकासकामांची चौकशी करण्यात यावा. ४) गावातील मूलभूत सुविधा तात्काळ सुधारणा करण्यात याव्यात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर