ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत कोपरगावचे खेळाडू चमकले:संजीवनी अकॅडमीची क्रीडा क्षेत्रातही आघाडी कायम, स्पर्धेत उपविजेतेपदावर मारली बाजी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोपरगाव संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने “साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६’ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दक्षिण विभागातील केरळ, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांतील बलाढ्य संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. समता इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या या सामन्यांमध्ये संजीवनी अकॅडमीच्या खेळाडूंनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध खेळ आणि उत्तम सांघिक समन्वयाच्या जोरावर उपविजेतेपद पटकावले. साखळी फेरीत संजीवनी संघाने सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याणचा २-० असा पराभव करून विजयी सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलचा ३-० असा दणदणीत पराभव करत संजीवनीने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात केरळच्या डॉन बॉस्को स्कूलविरुद्ध अत्यंत चुरशीची लढत झाली. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर, पेनल्टी शूटआऊटमध्ये संजीवनी अकॅडमीने ४-३ असा थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलविरुद्ध संजीवनीच्या खेळाडूंनी जिद्दीने संघर्ष केला आणि उपविजेतेपद मिळवले. या संघात कर्णधार विहान वाघ, गोलरक्षक ईशान सय्यद, आर्यन सोनवणे, सात्विक औताडे, नैतिक सरोज, गगनराजे जाधव, निर्भय पारख, आरुष शिंदे, प्रत्यूष जाधव, विश्वजित मांजरे, श्रेयस भड आणि शौर्य वैभव घुले या संजीवनीच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली कोल्हे, डिरेक्टर ऑफ ऑडिट सुंदरी सुब्रमण्यम आणि प्राचार्या अनुश्रीता सिंह यांनी खेळाडूंसह क्रीडा विभाग प्रमुख विरुपक्ष रेड्डी व फुटबॉल प्रशिक्षक मोती कुमार यांचे विशेष अभिनंदन केले आहे. स्पर्धेतील थरारक प्रवास असा संजीवनी अकॅडमीच्या खेळाडूंनी साखळी फेरीत कल्याणच्या सेंट्रल रेल्वे स्कूलवर २-० ने मात करून संजीवनीची विजयी सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलचा ३-० ने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत केरळच्या डॉन बॉस्को स्कूलविरुद्ध १-१ च्या बरोबरीनंतर, पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा संजीवनीचा थरारक विजय मिळवला तर अंतिम फेरीत पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलविरुद्ध जोरदार संघर्ष करत संजीवनी अकॅडमीची रौप्य पदकाची कमाई.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर