ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार’:जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून कॉंग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आता गांधींची गांधीगिरी नाही, तर गोडसेंची गोळी’ चालणार असे वादग्रस्त विधान निलेशचंद्र यांनी केले आहे. कॉंग्रेसने निलेशचंद्र यांचा व्हिडिओ ट्विट करत जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेसने म्हटले, हे निलेशचंद्र स्वतःला ‘जैन धर्मगुरू’ म्हणवून घेतात, पण प्रत्यक्षात मात्र समाजात विष कालवणारी आणि हिंसेचे समर्थन करणारी चिथावणीखोर भाषणं ठोकतात. आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अनादर करण्याची यांची लायकी काय? आणि ज्याने या अहिंसेच्या साधकावर गोळी झाडली, त्या देशातील पहिल्या आतंकवाद्याचं हे जाहीर कौतुक करतात? कसली विकृती आहे ही, अशी टीका केली आहे. यांना कोणत्या तोंडाने ‘जैन धर्मगुरू’ म्हणायचं? तसेच यांना कोणत्या तोंडाने ‘जैन धर्मगुरू’ म्हणायचं? असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. हे तर केवळ सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर समाजासमाजात दंगली घडवून आणणारी आणि भांडणं लावणारी ही भाडोत्री जनावरं आहेत. यांच्या डोक्यात ना भगवान महावीरांचा ‘अहिंसा परमो धर्मः’ हा पवित्र विचार आहे, ना यांच्या जगण्यात किंवा आचारात सत्याचा लवलेश आहे! पांढरे वस्त्र काढून उघडे करायला वेळ लागणार नाही धर्मगुरूच्या वस्त्राआड लपलेला हा केवळ एक राजकीय दलाल आहे, ज्याचा धर्माशी आणि मानवतेशी काडीचाही संबंध नाही. या गावगुंडाने आपली भाषा सांभाळावी नाहीतर याचे पांढरे वस्त्र काढून यांना उघडे करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही कॉंग्रेसने दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर