ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या?:स्वतःला बाळूमामाचा अवतार समजत होता; फिर्यादीने तक्रारीत काय म्हटले?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर पोलिसांनी स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या भोंदू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत तो जामिनावर असताना आता पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने त्याची या भोंदूने कशी फसवणूक केली? याची विस्तृत माहिती पोलिसांना दिली आहे. त्यात त्याने आरोपीला काळ्या जादूची अघोरी विद्या प्राप्त असल्याचाही दावा केला आहे. फिर्यादीच्या मते, 21 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 च्या सुमारास तक्रारदार व त्यांचा मित्र दोघे कुर्डूवाडी येथे कामानिमित्त गेले होते. रात्री 10 च्या सुमारास जेवण करण्यासाठी ते हॉटेल शोधत कुर्डूवाडी बायपास रोड येथे थांबले होते. त्यावेळी तक्रारदार आपल्या मित्राला आपल्याला धंद्यात यश येत नसल्याचे सांगत होता. तेव्हा एका अनोळखी इसमाने त्यांना तुम्हाला व्यवसायात यश येत नसेल, तर मनोहर मामा भोसले हे महाराजांकडे जाण्याचा सल्ला दिला. मनोहर भोसलेला काळ्या जादूची अघोरी विद्या प्राप्त आहे. ते काळी जादू करून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करतात. तुम्हालाही तुमच्या अडचणी दूर करायच्या आहेत का? असे सांगून त्यांनी तक्रारदाराला एक मोबाईल क्रमांक दिला. तसेच हा नंबर मनोहर मामा भोसले यांचा असल्याचेही सांगितले. त्यानुसार, तक्रारदाराने त्या नंबरवर कॉल केला. तसेच आपली अडचण सांगितली. त्यावर त्यांनी तक्रारदाराला आणखी एक नंबर देऊन या नंबरवर व्हिडिओ कॉल करून त्यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले. तक्रारदाराने आयुष्यात खूप अडचणी असल्यामुळे व धंद्यात यश नसल्यामुळे सदर नंबरवर व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी व्हिडिओ कॉलवर एका अनोळखी व्यक्तीने ते करत असलेल्या अघोरी प्रथा व जादूटोणाच्या प्रकारच्या पूजेविषयी तक्रारदाराला सांगितले. अघोरी पुजेसाठी मागितले 2 लाख, 50 हजार अॅडव्हान्स सदर व्यक्तीने मनोहर मामा यांना अघोरी विद्येचे ज्ञान प्राप्त आहे, ते तुमच्या जीवनात सुख, शांती, पैसा हवा असेल तर मनोहर मामा सांगतील तशी तुम्ही पूजा करा असे सांगत तक्रारदाराला विश्वासात घेतले. त्यावर तक्रारदाराने पूजेसाठी लागणाऱ्या खर्चाची विचारणा केली. त्यावर त्या व्यक्तीने 2 लाख रुपये सांगत अॅडव्हान्स 50 हजार रुपये भरण्याची सूचना केली. मामांनी अनेक लोकांचे जीवन सुखी केले आहे. त्यामुळे तुम्हाला अॅडव्हान्स भरायचे असतील तर 23 एप्रिल 2026 रोजी करमाळा तालुक्यातील निभोरे येथील मठाजवळ येऊन पैसे द्या, असेही तो व्यक्ती तक्रारदाराला म्हणाला. या घटनेनंतर तक्रारदाराने सदर इसमावर विश्वास ठेवून 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला असा त्याने त्यांना करमाळा येथील निंभोरे येथे असणाऱ्या मनोहर मामाच्या मठाकडे जाऊन तेथील आमच्या माणसाकडे पैसे देण्याची सूचना केली. तसेच त्यानंतर पौर्णिमेला तुमची पूजा करू अशी खात्रीही दिली. त्यानुसार, तक्रारदार करमाळा तालुक्यातील मनोहर मामाच्या मठाकडे रात्री 7.30 च्या सुमारास पोहोचला. त्यावेळी मठाच्या बाजुला एक व्यक्ती उभा होता. त्याने पूजेसाठी अॅडव्हान्स देण्यासाठी आला आहात का? असे विचारले. अन् फसवणूक झाल्याची पटली खात्री तक्रारदाराला मनोहर मामांनीच पाठवले आहे. तुम्ही ते पैसे माझ्याकडे द्या असे सदर अनोळखी इसमाने सांगून तक्रारदाराकडून रोख रक्कम 50 हजार रूपये त्याच्याकडे सुपुर्द करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने सदरची रक्कम त्याच्याकडे दिली. त्यानंतर तक्रारदार त्यांना पुजेबाबत विचारले असता तो काहीएक सांगत नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने वर दिलेल्या मनोहर मामा भोसले व व्हिडीओ कॉल केलेल्या इसमांना फोन केले असता त्यांचे फोन लागत नव्हते. तसेच सदरचा इसम हा तात्काळ तेथून निघून गेला. म्हणून तक्रारदाराला खात्री झाली की, मनोहर मामा भोसले, 91560XXXXXX या नंबरचा धारक व अनोळखी इसम यांनी संगणमत करून आपली फसवणूक केली. कोण आहे मनोहर मामा? मनोहर भोसले हा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा मूळ रहिवासी आहे. डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर तो आठवडी बाजारात सुके बोंबील विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. एकेदिवशी तो अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर काही वर्षांनी तो परत आला. आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न झाल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. त्याने करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात स्वतःचा मठ सुरू केला. साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या व पौर्णिमेला त्याच्याकडे भक्तांची मोठी गर्दी होऊ लागली. त्याचे अनेक मोठ्या नेत्यांसोबत फोटो आहेत. असे सांगितले जाते की, अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते त्याच्या सल्ल्यासाठी त्याच्याकडे येत होते. मनोहर भोसलेवर यापूर्वी एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा करमाळा पोलिसांत दाखल आहे. तसेच कॅन्सर बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बारामतीत नोंद आहे. याशिवाय मणक्याचे आजार दूर करण्याची हमी देऊन अन्य एकाची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात दाखल आहे. हे तीन गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्याची भोंदूगिरी अविरत सुरू होती. पण आता त्याचा पाय खोलात गेल्याची चर्चा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर