ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयात नाक खुपसू नये!:मोदींचे नेतृत्व सक्षम, संजय राऊत काँग्रेसचे दलाल, नवनाथ बन यांची टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी
बसलेले आहेत, संजय राऊत यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाईल अशी वक्तव्य तुम्ही करु नका, भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सक्षम आणि समर्थपणे पुढे जात आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे 140 कोटी जनतेने पाहिले आहे. राऊतांकडून आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचे काम केले जात आहे. देशात राहून परदेशी लोकांचे गुणगान गायचे हे संजय राऊत यांचे धोरण झाले आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान करण्याचे त्यांचे धोरण झाले आहे. गुलामांनी इतराबद्दल आरोप करू नये नवनाथ बन म्हणाले की, भारत अमेरिकेचा गुलाम झालेला नाही, या दोन्ही देशामध्ये झालेल्या करारामध्ये जो काही निर्णय झाला त्यामुळे आपल्यावरील टॅरिफ कमी झाला आहे. राऊत हे राहुल गांधी, सोनिया गांधीचे गुलाम झाले आहेत. ते काँग्रेसचे दलाल झाले आहेत. गुलामांनी इतराबद्दल आरोप करू नये. राऊतांनी नाक खुपसण्याची गरज नाही नवनाथ बन म्हणाले की, युद्धाची जी काही स्थिती आहे त्यावर आपले पराराष्ट्र मंत्री आणि देशाची व्यवस्था पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. याप्रकरणामध्ये राऊतांनी नाक खुपसण्याची गरज नाही. ते पंतप्रधान मोंदीचा अपमान होईल अशी भाषा वापरत आहे, हा पंतप्रधानांचा नाही तर 140 कोटी भारतीयांचा आहे. भारतामध्ये राहायचे आणि इतर देशातील लोकांचे गुणगान गायचे हा राऊतांचा धंदा झाला आहे. राऊतांनी स्वत:ची चिंता करावी नवनाथ बन म्हणाले की, आखाती देशांमध्ये जे कोणी भारतीय नागरिक आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम यंत्रणाकडून केले जाईल, राऊतांनी त्यांची चिंता करू नये. तु्ही तुमच्या पक्षात तुमची काय अवस्था आहे यांची चिंता केली पाहिजे. तुमच्या उबाठा गटात तुम्हाला कोणी विचारत नाही, त्यामुळे अधून मधून काँग्रेस, शरद पवार गटाची प्रवक्तेगिरी करणे हा तुमचा धंदा आहे. अखाती देशात काही भारतीय नागरिक अडकले आहेत त्यांना देशात सुरक्षित आणण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. देशाची चिंता करण्याची जबाबदारी जनतेने मोदींना दिली आहे तुम्ही पक्षाची आणि स्वत:ची चिंता करा. राऊतांनी फडणवीसांची माफी मागावी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे VSR मध्ये विमान असेल आणि राजकीय नेत्यांची त्यामध्ये गुंतवणूक असेल असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांनी माफी मागावी मी असे कालच सांगितले होते पण संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही त्यामुळे मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवत आहे. संजय राऊत यांनी 7 दिवसांत फडणवीसांची माफी मागावी अन्यथा या प्रकरणामध्ये कायदेशीरबाबीला सामोरे जावे लागेल. सोमय्या, भुसे यांच्या प्रकरणी जशी कोर्टात जाऊन माफी मागितली. आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दलदेखील तुम्हाला माफी मागावी लागेल. तुम्ही बिनबुडाचे आरोप करतात. त्यांनी काल नशेमध्ये आरोप केले असतील. त्यांच्याकडे पत्राचाळ, कोविड काळात केलेल्या घोटाळ्याचे पैसे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर