ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

2025 मध्ये राज्यात 13515 महिला, अल्पवयीन मुली अजूनही बेपत्ता:महिला, मुलींच्या शोधावर ठरेल पोलिस ठाण्यांचे ‘रँकिंग’ – मुख्यमंत्री

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, आता पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता त्यांच्या शोधमोहिमेतील यशावरून मोजली जाणार आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामगिरीवरच आता पोलिस ठाण्यांचे ‘नामांकन’ ठरवण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलांचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शोधमोहिमेला गती देण्यासाठी शासन विशेष पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंतेचे असले तरी शोध घेण्याच्या प्रमाणात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१,१९३ मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता महिलांपैकी साधारण ५५ ते ६० टक्के महिला वर्षभरात सापडतात, तर तीन वर्षांत हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत जाते. मात्र, “वर्षभरानंतर कुटुंबीय आणि पोलिस दोघांचाही पाठपुरावा कमी होतो. ही चिंतेची बाब आहे,’ असे फडणवीस यांनी नमूद केले. आता विशेष पथकांकडे जबाबदारी शोधमोहिमेत सातत्य राखण्यासाठी आता विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. बेपत्ता महिला व मुलींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली दरमहा आढावा बैठक घेतली जाणार आहे. ज्या पोलिस ठाण्यांची कामगिरी सर्वोत्तम असेल, त्यांना मानांकन देऊन गौरवण्यात येईल. केवळ गुन्हे नोंदवणे पुरेसे नाही तर बेपत्ता व्यक्तींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणे याला पोलिसांचे प्राधान्य असले पाहिजे. १२ हजार महिलांचा अजूनही शोध नाही २०२४ मध्ये ४५ हजार ६६२ महिला तर ११ हजार ३१६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १४ हजार ७८५ महिला तर २८४१ अल्पवयीन मुली अजूनही बेपत्ता आहेत. तर २०२५ मध्ये ४८,२७८ महिला तर १२ हजार ११३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ११ हजार ६९७ महिला तर १८१८ अल्पवयीन मुलींचा अजून शोध लागलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत २०२५ मध्ये २६१६ महिला तर ७९७ अधिक मुली बेपत्ता झाल्याची कबुली शासनाने दिली. ७९७ मुली बेपत्ता होणे चिंताजनक महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्यांनी सांगितले की, महिला आणि मुली बेपत्ता होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२५ मध्ये ७९७ अधिक मुली बेपत्ता होणे चिंताजनक आहे. दिव्य मराठी अॅनालिसिस पोलिसांच्या तपासात सातत्य राहण्यासाठी आणखी प्रयत्न हवे, एआयची मदत गरजेची महिला व मुली बेपत्ताचे प्रमाण वाढत आहे. केवळ गुन्हे नोंदवणे पुरेसे नसून त्याचा तपास लावणे अनिवार्य झाले आहे. अनेकदा तपास थंडावतो हे मुख्यमंत्री फडणवीसांनीच जाहीर केले. त्यावरून ते पोलिस अधिकाऱ्यांवर नाराज असल्याचे दिसून येतेच. तरीही पोलिसांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना काम करण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. मात्र, केवळ तेवढ्यानेच काम भागणार नाही. तर पोलिस यंत्रणांना अधिक जबाबदार, विश्वासार्ह बनवावे लागेल. बेपत्तांच्या शोधासाठी एआयचा वापर करावा लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर